Join us

या कारणामुळे रखडला वरुण धवन आणि नताशा दलालचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:03 IST

वरुण धवन आणि नताशा दलालचे नातं आता कुणापासून लपून राहिलेले नाही

वरुण धवन आणि नताशा दलालचे नातं आता कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे रोमाँटिक फोटोपासून व्हॅकेशनपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर बिनधास्त शेअर करत असतात. आज वरुण आपला 33 वा वाढदिवस साजरा करतो आहे. बर्थ डे च्या दिवशी वरुण एक मोठी अनाऊंसमेंट करण्याच्या तयारी होता. कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे वरुण कुटुंबीयांसोबत वेळ घालवतो आहे. 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुण बर्थ डेचा मुहूर्त साधत गर्लफ्रेंड नताशासोबत साखरपुड्याची घोषणा करणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांनी हा प्लॅन रद्द केला. दोघे डेस्टिनेशन व्हेडिंगच्या प्लॅनिंगमध्ये आहेत. याआधी अशी चर्चा होती की दोघे डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर वरुण सारा अली खानसोबत 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत. 

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल