Join us  

VIDEO : अरे घर कमी पडलं का? ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं एअरपोर्टवर सुरू केला रोमान्स, भडकले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:12 AM

Drishyam 2, Shriya Saran : श्रिया सरन नुकतीच पती आंद्रेई कोशिएव्हबरोबर एअरपोर्टवर दिसली. यावेळी श्रिया अशा काही रोमॅन्टिक मूडमध्ये आली की, तिने सर्वांसमोरच आपल्या पतीला लिपलॉक केलं.

अभिनेत्री श्रिया सरन (Shriya Saran) एक बिनधास्त अभिनेत्री. सध्या श्रिया तिच्या ‘दृश्यम 2’  ( Drishyam 2 ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  खऱ्या आयुष्यात  श्रिया जाम बोल्ड आहे. अनेकदा पतीसोबत पब्लिकली रोमॅन्टिक होताना तिला तुम्ही बघितलंच असेलच. आता काय तर एअरपोर्टवरच श्रियाचा रोमान्स सुरू झाला. एअरपोर्टवरच्या तिचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांनी श्रियाला ट्रोल करायला सुरूवात केली.

श्रिया सरन नुकतीच पती आंद्रेई कोशिएव्हबरोबर एअरपोर्टवर दिसली. यावेळी श्रिया सरनने फोटोग्राफर्सना मस्तपैकी पोज दिली. यानंतर श्रिया अशा काही रोमॅन्टिक मूडमध्ये आली की, तिने सर्वांसमोरच आपल्या पतीला लिपलॉक केलं.

 तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पाहून लोकांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं.  सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर  शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.‘दृश्यम 2’च्या प्रीमिअरलाही श्रिया पतीसोबत लिपलॉक करताना दिसली होती.  घर कमी पडलं की, जे कॅमेरा पाहून शो ऑफ करतेय, अशी कमेंट एका युजरने केली. घरी जागा नाही का की कॅमेºयासमोर आणखी मजा येते? असा सवाल एका युजरने केला. तुम्ही नवरा बायको आहात, हे जगाला माहित आहे. मग असं वागणं गरजेचं आहे का? असं एका युजरने लिहिलं.  सार्वजनिक ठिकाणी असं काही करताना जरा तरी लाज बाळगा, अशी कमेंट एका युजरने केली.

श्रियाने 2001 मध्ये ‘इशतम’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. 2007 मध्ये, तिने इम्रान हाश्मीसोबत ‘आवारापन’ हा चित्रपट केला होता. बॉलिवूडच्या अनेक आयटम साँगदेखील ती झळकली आहे. बॉलिवूडमध्ये श्रियाला प्रसिद्धी मिळाली ती अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटातून.  2018 मध्ये श्रियाने तिचा बॉयफ्रेंड आंद्रेई कोशिएव्हसोबत 2018 मध्ये लग्न केलं. आंद्रेई कोशिएव्ह हा एक व्यावसायिक आणि टेनिसपटू आहे.

श्रियाचा ‘दृश्यम 2’ चित्रपट  18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.  

टॅग्स :श्रिया सरनदृश्यम 2बॉलिवूडसेलिब्रिटी