Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली, “मी पवित्र... पुरुषांनी माझ्यापासून दूर राहा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 15:46 IST

राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.  नुकतेच राखी मक्का मदिनाहून परतली आहे. एका कार्यक्रमादरम्यान राखी अबायात दिसली. हा लूक पाहून यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओत राखीने लाल रंगाचा अबाया घातलेला दिसून येत आहे. एका कार्यक्रमात तीने हजेरी लावली होती. यावेळी फोटो काढण्यासाठी जवळ येणाऱ्या पापाराझींना राखी म्हणते की, “कृपया माझ्या जवळ कोणी येऊ नका. पुरुषांनी तर मला स्पर्शही करू नका. मी मक्का-मदीनाला जाऊ आली आहे. त्यामुळे पुरुषांनी माझ्यापासून दूर राहा. मला स्पर्श करू नका. जरा तरी लाज बाळगा, मी पवित्र आहे.”

राखीचे हे व्हिडिओ पाहून काही नेटेकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज', 'प्रत्येकवेळी नौटंकी करणं गरजेच नाही',  अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘तुला पवित्र असण्याचा अर्थ तरी माहित आहे का? उगाच स्वतःला पवित्र म्हणून घेतेय, असे एका युजरने म्हटले. 

राखी तिचा पहिला उमराह करून परतली आहे. आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि आपले नाव बदलून फातिमा ठेवले होते. सध्या दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. आदिलच्या म्हणण्यानुसार, राखीने त्याला फसवलं आणि अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आदिलने तिच्याशी गैरवर्तन केलं. 

टॅग्स :राखी सावंतबॉलिवूड