Join us  

'किचन कल्लाकार' मधल्या 'ओ शेठ'ची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 9:00 AM

Kitchen Kalakaar शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) सुत्रसंचालन करत आहे. तर प्रशांत दामले (Prashant Damle) परिक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. या शोमध्ये ''ओ शेठ''... असा आवाज करताच येतो अभिनेता प्रणव रावराणे.

छोट्या पडद्यावर नुकताच 'किचन कल्लाकार' हा नवीन शो सुरु झाला आहे. शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी आपली पाककृती सादर करताना दिसतात. या शोचे संकर्षण कऱ्हाडे सुत्रसंचालन करत आहे. तर प्रशांत दामले परिक्षकाच्या भूमिकेत झळकत आहेत. या शोमध्ये ''ओ शेठ''... असा आवाज करताच येतो अभिनेता प्रणव रावराणे. तिची हटके एंट्री पाहून चाहतेही हसून हसून लोटपोट होतात. त्याचा अंदाजही चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरतो. मुळात प्रणव या शोमध्ये आकर्षणाचे क्रेंद्र ठरत आहेत. प्रणवने याधी काही मालिकांबरोबरच मराठी सिनेमातही काम केले आहे. 

 

'दुनियादारी' या सिनेमात प्रणवने सॉरीची भूमिका लक्षवेधी ठरली होती. या सिनेमामुळे तो खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आला. अभिनेता म्हणून त्याने स्वतःला सिद्ध करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.  तसेच हस्यसम्राट, फु बाई फु या शोमधून त्याने रसिकांना खळखळून हसवले आहे.पण स्टँडअप कॉमेडीयन म्हणून नाही तर अभिनेता म्हणून त्याला आपली एक ओळख निर्माण करायची होती. दुनियादारी हा सिनेमा त्याच्या करिअरसाठी खर्‍या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला.

 

प्रणवची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. अमृता सकपाळ रावराणे असे तिचे नाव आहे. प्रणवने १८ डिसेंबर २०१६ रोजी अमृता सकपाळसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. पारंपरिक रितीरिवाजनुसार या दोघांचे मोठ्या थाटात लग्न पार पडले होते.अमृता सध्या छोट्या पडद्यावरील 'घेतला वसा टाकू नको' या मालिकेत झळकत आहे.मालिकेत महाराणी सुमाताची भूमिका ती साकारत आहे. या मालिकेआधी अमृता 'अवघाची हा संसार', 'वहिनीसाहेब', 'लज्जा', 'मंगळसूत्र', 'पारिजात', 'माझे मन तुझे झाले', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'दुर्वा', 'नकुशी', 'प्रेम पॉइजन पंगा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रणवप्रमाणे अमृतानेही मराठी सिनेक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर दोघांचेही फोटो पाहायला मिळतात. दोघेही शूटिंगमधून वेळ काढत एकत्र क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात. सोशल मीडियावर दोघेही कपल गोल देताना दिसतात. चाहतेही दोघांचे एकत्र फोटो पाहून लाईक्स कमेंट्स करत पसंती देत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 

टॅग्स :प्रशांत बंब