Join us  

'फायटर' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 9:35 AM

'फायटर' च्या यशानंतर साहजिकच चाहते आता सिक्वेलची वाट पाहत आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा 'फायटर' हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून  आहे. 'फायटर' बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. चार दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 

'फायटर' च्या यशानंतर साहजिकच चाहते आता सिक्वेलची वाट पाहत आहेत. सिनेमाच्या सिक्वेलबाबत सिद्धार्थ आनंदने अपडेट शेअर केलं आहे.  'पिंकव्हिला'शी बोलताना तो म्हणाला, 'आता हे प्रेक्षक ठरवतील...बघूया, चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झालेत. मला वाटतं प्रेक्षकांचं प्रेमच ठरवेल आपण काय करायचं की नाही. आम्हाला 'फायटर 2' बनवायला आवडेल. आमच्याकडे काही उत्तम कल्पनाही आहेत'.

'फायटर' हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसं हवाई हल्ला करतं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात अनेक ट्विस्ट आणि टर्न आहेत.  हृतिक, दीपिका, करण सिंग ग्रोव्हर, अनिल कपूर आणि अक्षय ओबेरॉय वैमानिकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात अभिनेता ऋषभ साहनी खलनायकाच्या भूमिकेत दिसला. एकंदरीतच हा सिनेमा देशभक्तिच्या रंगात रंगलेला दिसत आहे.

देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'फायटर'ने जगभरात प्रचंड नफा कमावला आहे. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याच वेळी, भारतातील कमाई 124 कोटींवर पोहोचली आहे. 'फायटर'आधी सिद्धार्थ आनंदचा (Siddharth Anand) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा शाहरुखच्या रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोणसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड