Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी ३' फेम दादूसच्या पत्नीला पाहिलंत का?; दिसायला आहे अभिनेत्रींपेक्षाही सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 07:00 IST

संतोष चौधरी हे मराठीतील लोकगीत गाणारे प्रसिद्ध गायक आहेत. त्यांनी अनेक आगरी आणि कोळी गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे.

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3)च्या तिसऱ्या सीझनमध्ये समजूतदारपणासाठी घरातील एक सदस्य खूप चर्चेत आले होते. हे सदस्य दुसरा तिसरा कुणी नसून दादूस उर्फ संतोष चौधरी (Santosh Chaudhary) आहेत. दादूस यांनी प्रत्येकाशी आदराने बोलून घरातील सदस्यच नाही तर प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. या शोमधून दादूस यांच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. दादूस यांच्या पत्नीला पाहिलेत का तुम्ही? त्यांच्या पत्नीचे नाव योगिता चौधरी असून त्या कोणत्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. 

संतोष चौधरी यांनी इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत एका मालिकेचे प्रमोशन केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, तू आयुष्यात आलीस आणि खरंच माझं आयुष्यच बदललं… लग्न करून तू घरी आलीस नि माझं भाग्य उजळलं. थँक्य यू! अशीच येतेय कावेरी आणि राजवर्धन यांच्या प्रेमाची हळूवार गोष्ट भाग्य दिले तुम्हाला ४ एप्रिलपासून सोम-शनि, रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

संतोष चौधरी हे मराठीतील लोकगीत गाणारे प्रसिद्ध गायक आहेत. संतोष यांनी अनेक आगरी आणि कोळी गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. त्याचे सोन्याबद्दलचं प्रेम पाहुन चाहत्यांनी त्यांना ‘गोल्डन मॅन’ असे नाव दिले आहे. आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ म्हणून संतोष यांची ओळख आहे. ‘दादूस’ भिवंडी येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतात. संतोष यांच्या पत्नीचे नाव योगिता चौधरी आहे.

योगिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. योगिता बरेचदा आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. दादूस यांची पत्नी योगिता ही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. योगिता यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी