Join us

'रंग माझा वेगळा' फेम सौंदर्या उर्फ हर्षदा खानविलकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, आहे या क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 07:00 IST

Rang Maza Vegla: हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) यांच्या सख्ख्या बहिणीबद्दल फारसे कोणाला माहित नाही.

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील सासू-सून म्हणजेच सौंदर्या आणि दीपाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. या मालिकेत सौंदर्याची भूमिका हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) यांनी साकारली आहे. तर दीपाची भूमिका रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. या मालिकेतील सर्व पात्रांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हर्षदा खानविलकर यांच्या सख्ख्या बहिणीबद्दल फारसे कोणाला माहित नाही. मात्र आम्ही तुम्हाला त्यांच्या सख्ख्या बहिणीबद्दल सांगणार आहोत.

सौंदर्या म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या सख्ख्या बहिणीचे नाव अर्चना पाटील आहे. त्यांचा सिनेइंडस्ट्रीशी अजिबात संबंध नाही. त्या कोलगेट पामोलिव इंडिया लिमिटेड कंपनीत सिनियर पदावर कार्यरत आहेत. मागील वर्षी हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या बहिणीचा आणि जीजूंचा फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसांचा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी ओळख करून देताना हर्षदा खानविलकर यांनी सांगितले की, ही माझी सख्खी बहिण अर्चना आणि माझा जीजू प्रवीण पाटील. 

हर्षदा खानविलकर यांनी दर्द या मालिकेतून अभिनयातील श्रीगणेशा केला. १९९९ मध्ये हर्षदा यांनी 'आभाळमाया' या मालिकेसाठी त्यांनी ऑडीशन दिली आणि त्यांची निवड झाली. ही मालिका त्यांच्यासाठी करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली. कॉलेजमध्ये असताना 'खेळ माझा', 'लग्नाची बेडी' या व्यायसायिक नाटकातून त्यांनी भूमिका केली. हळूहळू अभिनय क्षेत्रात बस्तान बसू लागले. त्यावेळी दुरदर्शनवरील दामिनी आणि पुढे आभाळमाया मालिकांमध्ये त्यांना काम मिळाले. ऊन पाऊस, कळत नकळत, 'गुरुकुल', उचापती, किमयागार या मालिकेत त्यांनी काम केले. या मालिकेनंतर हर्षदा खानविलकर निर्मिती क्षेत्राकडे वळल्या.

प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांच्यासोबत हर्षदा यांनी ‘हॅपनिंग्ज अनलिमिटेड’ या नामक निर्मिती संस्था काढली. ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही त्यांची निर्मिती असलेली पहिला मालिका होती. अभिनयासोबतच हर्षदा कॉश्च्युम डिझायनरसुद्धा आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनिंग केले आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह