Join us

Guess Who 'नवरा माझा नवसा'चा सिनेमातल्या VJ कँडीला ओळखले का? आज आहे घराघरात फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:16 IST

सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो.

'नवरा माझा नवसा'चा सिनेमात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ यांच्या अभिनयाने धमाल उडवून दिली होती. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. आजही सिनेमा टीव्हीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो.या सिनेमात आणखी एक व्यक्तिरेखा होती. जी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. व्हिजे कॅंडीच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री होती मधुराणी गोखले प्रभुळकर.'नवरा माझा नवसाचा' या सिनेमात मधुराणीची भूमिका लक्षवेधी ठरली होती. या सिनेमाशिवाय तिने अनेक सिनेमांमध्येही काम केले आहे. 

अभिनेत्री मधुराणी यांनी या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी सिनेमातही आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली आहेत.

मधुराणी आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे. अरुंधती ही भूमिका आज घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने मधुराणीनेने तब्बल १० वर्षांनी मालिकेत कमबॅक केले होते. आज अरुंधती म्हणूनच तिला जास्त ओळखले जाते. मधुराणीने मुलीच्या जन्मानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. मुलीची काळजी घेता यावी यासाठी हा ब्रेक घेतला होता. तसेच 'आई कुठे काय करते' मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतल्याचे मधुराणीने मुलाखतीत सांगितले होते.

मधुराणीचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ झालं. ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'युथट्युब' या मराठी सिनेमाचेही प्रमोद प्रभुलकर यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रमोद प्रभुळकर अभिनय कार्यशाळाही चालवतात. अभिनेत्री शिवानी बावकर,पौर्णिमा डे सारखे कलाकारांनीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

 

या कलाकारांनी आज इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मधुराणी आणि प्रमोद प्रभुळकर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दोघेही बिझी शेड्युअलमधून आवर्जुन वेळ काढत कुटुंबासह एन्जॉय करताना दिसतात.त्यांच्या या फोटोंनाही चाहत्यांचे भरभरुन लाईक्स मिळत असतात.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकासचिन पिळगांवकर