Join us

धरमपाजींनी त्यांच्या गावात बांधलाय कोट्यवधीचा बंगला, आतून दिसतो असा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:24 IST

धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर आपल्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत असतात.

आपल्या अभिनयाने ८०च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देणारे आणि आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. कुणी त्यांना बॉलीवूडचे हिमॅन म्हणतं तर कुणी वीरू… रसिकांनी धरमपाजींवर कायमच प्रेम केलं आहे. आजही धर्मेंद्र यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. धरमपाजीं सोशल मीडियावर सक्रीय असून तिथंही त्यांचे अनेक चाहते आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर आपल्या फार्महाऊसचे फोटो शेअर करत असतात. 

आपला बराच वेळ ते इथंच घालवतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या बंगल्याची झलक चाहत्यांना दाखवली होती. सोशल मीडियावर धरमपाजींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून या बंगल्याची किंमत कोट्यवधीच्या घरात असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या बंगल्यात मोठमोठ्या मूर्ती आणि कारंजे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः धरमपाजीसुद्धा दिसत आहेत. मेथीचे पराठे आणि चहाचा ते आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसोबत धर्मेंद्र यांनी एक पोस्ट लिहिली होती. 

“हे सगळं देवानं दिलं असून तोच एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे. हे जीवन खूप सुंदर आहे, मित्रांनो या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. लव यू, चीअर अप” असं धर्मेंद्र यांनी पोस्टमध्ये म्हटलं होते. धरमपाजींच्या या पोस्टला त्याच्या चाहत्याने उत्तर दिले होते. “धरमपाजी जीवनाचा आनंद घेणं, चांगलं व्यक्ती कसं बनावं हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे. लव यू धरमपाजी” अशा शब्दांत  चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. धर्मेंद्र यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला होता.  

टॅग्स :धमेंद्र