Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना नव्हतं मान्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "त्यांना आम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:21 IST

ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने याचा खुलासा केला आहे. 

ईशा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक असलेल्या ईशाला घरातून अभिनयाचं बाळकडू मिळालं. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ईशाने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं. 'कोई मेरे दिल से पुछे', 'धूम', 'ना तुम जानो ना हम', 'युवा', 'आँखे', 'राज ३', 'LOC कारगिल' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ती दिसली. पण, ईशाचं बॉलिवूडमध्ये करिअर करणं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने याचा खुलासा केला आहे. 

ईशाने नुकतीच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "जेव्हा मी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला. तेव्हा सुरुवातीला ग्रीन सिग्नल(परवानगी) मिळवणं थोडं कठीण गेलं. पण, परवानगी मिळल्यानंतर बोनी कपूर यांनी मला कोई मेरे दिल से पुछो सिनेमाची स्क्रिप्ट दाखवली. ना तुम जानो ना हम या सिनेमाची स्क्रिप्टही मला आवडली होती. त्यामुळे मी दोन्ही सिनेमांचं शूटिंग एकत्रच करत होते". 

"मी बॉलिवूडमध्ये करिअर कराव असं माझ्या वडिलांना वाटत नव्हतं. कारण, त्यांना आमची जास्त काळजी वाटते आणि त्यांना आमचं आयुष्य प्रायव्हेट ठेवायचं होतं. पण, याउलट मी खूप उत्साही होते," असंही ईशाने पुढे सांगितलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दोघेही बॉलिवूडमधले सुपरस्टार आहेत. पण, त्यांच्या लेकीला मात्र हे स्टारडम मिळालं नाही. अनेक सिनेमात काम करूनही ईशाला यश मिळालं नाही. त्यामुळे काही सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला. 

दरम्यान, ईशा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे काही दिवस चर्चेत होती.पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेत  ईशा वेगळी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वेगळं होत असल्याबद्दल तिने सांगितलं. २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. सुखी संसाराच्या १२ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुली आहेत.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रहेमा मालिनी