Join us

आलियाबाबत रणबीरने सर्वातआधी दीपिकाला दिली होती माहिती, काय होती दीपिकाची रिअॅक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 17:46 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात प्रेमाचं नातं असल्याचं आता कन्फर्म झालंय. रणबीरने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला.

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात प्रेमाचं नातं असल्याचं आता कन्फर्म झालंय. रणबीरने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. पण या नात्याबद्दल सर्वातआधी कुणाला माहीत होतं हे तुम्हाला माहीत आहे का? ही व्यक्ती दुसरी कुणी नसून रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड अभिनेत्री दीपिका पदुकोन ही आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रणबीरने आलियासोबतचं आपलं नातं कन्फर्म करण्याआधी याबाबत दीपिकाला सांगितले होते. दोघांच्या एका कॉमन मित्राने एका वेबसाईटला ही माहिती दिली. त्याने सांगितलं की, रणबीर आणि दीपिका आजही चांगले मित्र आहेत. आजही ते एकमेकांचे सिक्रेट शेअर करतात. दीपिकाला हे सांगितल्यावर ती रणबीर आणि आलियासाठी फारच आनंदी झाली. अशाप्रकारची मैत्री आज कुठे बघायला मिळते. 

दीपिका आणि आलिया या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. रणबीरचं दीपिकासोबत अनेक वर्ष अफेअर होतं. त्यानंतर तो कतरिनाच्या प्रेमात पडला होता. आणि आता तो आलियासोबत नात्यात आहे. संजूच्या ट्रेलरवेळी रणबीरने खुलासा केला होता की, त्याच्या आत्तापर्यंत केवळ 10 गर्लफ्रेन्ड होत्या. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणबीर कपूर