Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका ठरली "हॉटेस्ट वुमन ऑफ द इयर"

By admin | Updated: June 2, 2017 10:49 IST

दिपीका पादुकोण "हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर" ठरली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2- आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने अभिनेत्री दीपिका पादूकोण नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिकाचे सिनेमे असतील किंवा कार्यक्रमातील तिची हजेरी नेहमीच चर्चेचा विषय असते. नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील रेड कार्पेटरवरसुद्धा दीपिकाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. आता दीपिकाने आणखी एक नवा किताब आपल्या नावे केला आहे.  दिपीका पादुकोण "हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर" ठरली आहे. फॅशन मॅगजीन मॅक्सीमने दीपिकाला हा किताब दिला आहे.  प्रसिद्ध फॅशन मॅगजीन मॅक्सीमने 100 हॉट वुमेन्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघींनी स्थान मिळवलं आहे. हार्ले बाल्डबीन, इम्मा वॉट्सन, इम्मा स्टोन, दकोता जॉन्सन आणि केन्डल जेनर या अभिनेत्रींचासुद्धा मॅक्सीमच्या यादीत समावेश आहे. 
"हॉटेस्ट वुमन ऑफ द इयर" ठरवण्यासाठी मॅक्मीमने एक सर्व्हे केला होता आणि प्रेक्षकांना वोट करायला सांगितलं होतं. यामध्ये दीपिकाच्या लाखो चाहत्यांनी तीला मतदान करून पहिल्या स्थानावर आणलं. मॅक्सीमने खास कॅप्शनसह व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 
दिपिकाने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मॅक्सीमच्या कव्हर पेजचा फोटो शेअर केला आहे. यात "हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर" म्हणून घोषीत करण्याचं तीने सांगितलं आहे. या फोटोमध्ये दीपिकाने आकर्षक अशी पोज दिली असून दिपीकाचा हॉट अंदाज बघायला मिळतो आहे. 
 
 
 
 
 
 
‘ट्रिपल एक्स : जेंडर केज’या सिनेमातून दीपिकाने हॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दिपिकाची अदाकारी पहायला मिळते आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१६च्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप १० अभिनेत्रींमध्ये दीपिकाचा समावेश होतो.