Join us

अरे बापरे...! सलमान खानच्या तोंडातून निघाली आग, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:41 IST

Dabangg 3 : सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचे 'हुड हुड दबंग' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. त्यात आता दबंग चित्रपटाच्या फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या भागातील एक नवीन गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचे बोल आहेत हुड हुड. त्यात सलमानच एक वेगळाच अंदाज असल्याने चाहत्यांनी हे गाणं डोक्यावर घेतलंय.

दबंग ३ चित्रपटाची सलमानचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यात आता या चित्रपटात सलमान एका वेगळ्या रुपात दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्कंटा आणखीन वाढली आहे. त्याची झलक नुकत्याच या चित्रपटातील हुड हुड गाण्यात पहायला मिळतंय. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

हे गाणं युट्युबवर १० मिलियन वेळा पाहिलं गेले. या गाण्यात सलमान त्याच्या तोंडातून आग बाहेर काढतो. त्याची ही अॅक्शन प्रेक्षकांना आवडली असून त्यांच्या कृतीचं चाहत्यांनी कौतुकही केले आहे.

दबंग ३ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे. अरबाज खान आणि निखिल द्विवेदी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. साजिद-वाजिद यांनी हे गाणं लिहिलं असून शबीना खान या गाण्याची कोरिओग्राफर आहे. जलीस शेरवानी आणि दानिश साबरी यांच्या लेखणीतून हे गाणं साकार झालं आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सलमान खानदबंग 3सोनाक्षी सिन्हा