Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानची अशीही ‘दबंगगिरी’, महेश मांजरेकरांच्या लेकीला केली मोबाईल बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:52 IST

सलमान खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे. यावेळी ‘दबंग 3’मध्ये केवळ चुलबुल पांडे व रज्जो नाहीत तर आणखी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीसोबत चुलबुल पांडे रोमान्स करताना दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे,अश्वमी.

ठळक मुद्देपोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना  ‘दबंग 3’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सलमान खान सध्या ‘दबंग 3’ या सिनेमात बिझी आहे. यावेळी ‘दबंग 3’मध्ये केवळ चुलबुल पांडे व रज्जो नाहीत तर आणखी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीसोबत चुलबुल पांडे रोमान्स करताना दिसणार आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे,अश्वमी. ही अश्वमी कोण तर, मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची लेक़ त्यामुळे ‘दबंग 3’मधील अश्वमीचा लूक पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पण ‘दबंग 3’चे शूटींग पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही. कारण शूट पूर्ण झाल्याशिवाय अश्वमीचा लूक रिवील न करण्याचा निर्णय भाईजानने म्हणे घेतलाय.

अश्वमी मांजरेकरचा लूक सीक्रेट राहावा यासाठी सलमानने संपूर्ण युनिटला सेटवर मोबाईल बंदी केली आहे. शूटींगदरम्यान युनिटमधील अनेक लोक मोबाईल फोन वापरतात. यामुळे सेटवरचे फोटो लीक होण्याचा धोका बघता, सलमानने सेटवर पूर्णपणे मोबाईल बंदी केली आहे. अश्वमीलाही सलमानने मीडियासमोर वा पब्लिक एरियात न जाण्याचे बजावले आहे. प्राप्त माहितीनुसार, सलमान खान स्वत: सोशल मीडियावर अश्वमीचे लूक शेअर करू इच्छितो. त्याआधी कुठल्याही परिस्थितीत तिचे फोटो लीक होऊ नयेत, अशी त्याची इच्छा आहे. त्याने मेकर्सलाही यासंदर्भात बजावले आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणून ओळखला जातो. अनेक नवोदित अभिनेत्रींना त्याने रुपेरी पडद्यावर पहिला ब्रेक दिला. सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, स्नेहा उल्लाल, झरीन खान अशी किती तरी नावे आपल्याला घेता येतील. याच यादीत आता अश्वमी मांजरेकरच्या नावाचा देखील समावेश होणार आहे. 

‘दबंग’ या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना  ‘दबंग 3’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमान सध्या या चित्रपटासाठी वजन कमी करत आहे.

 

टॅग्स :सलमान खानदबंग 3महेश मांजरेकर