Join us  

coronavirus: म्हणून अक्षयनं दिली एवढ्या कोटींची मदत, पत्नी ट्विंकल खन्नानं सांगितलं भावूक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 7:03 PM

खिलाडियो का खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही

मुंबई - देशावरील प्रत्येक संकटावेळी अक्षयकुमार नेहमीच आपलं योगदान देत असतो, पुढाकार घेऊन इतर अभिनेत्यांच्या तुलनेत मदत देत असतो. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असो, शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी असो किंवा शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी असो, अक्की नेहमीच सर्वांच्या पाठिशी उभारतो. आजही अक्षय कुमारने कोरोना कोविड १९ च्या लढाईत पंतप्रधान निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. अक्षयच्या या मदतीमुळे पत्नी ट्विकलने अक्षयचा मला अभिमान वाटतो, असे म्हटले आहे. तसेच, ज्यावेळी अक्षयने २५ कोटी रुपयांची मदत देण्याचं सांगितलं, तेव्हा पत्नी म्हणून मीही त्याला नक्की विचार केलायंस ना? असा प्रश्न विचारला. पण, अक्षयच्या उत्तराने ट्विंकल खन्नाही भावूक झाली. 

खिलाडियो का खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा मात्र अक्षय प्रत्येकाला मदतीचा हात देत असतो हे ही तितकेच खरे आहे. अक्षय हा फक्त रिल नाही तर रिअल लाइफमध्येही हीरो आहे हेच पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. 

कोरोना नावाच्या संकटाशी लढा देणा-या देशातील लोकांसाठी अभिनेता अक्षय कुमारदेखील दानवीर म्हणून पुढे आला आहे. अक्षयने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी एक नाही दोन नाही तर चक्क २५ कोटी रुपयांचे दान केले आहे. फक्त रील लाइफच नव्हे तर ख-या आयुष्यातही  खिलाडींयों का खिलाडी आहे अक्षय कुमार, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अक्षयच्या या निर्णयावर नक्कीच पत्नी म्हणून ट्विंकलने काळजीने अक्षयला प्रश्न केला होता. नक्की तू एवढी मोठी रक्कम मदत करणार आहे?. त्यावर, अक्षयकुमारने दिलेलं उत्तर अतिशय भावूक होतं. मी जेव्हा कामाला सुरुवात केलीी, तेव्हा मी काहीही नव्हतो, तिथपासून मी या पोझिशनपर्यंत पोहोचलोय. अक्षयच्या या उत्तराने भावूक पत्नीने मी अक्षयला कसे रोखणार असे म्हणत. काहीही नसलेल्या लोकांसाठी तो काही करतोय, त्याला मी कसे रोखणार, असे ट्विंकल खन्नाने म्हटलंय. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी आपपल्या परिने कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहेत. यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हळुहळु बॉलिवूडमधील अनेक कलाकाराही मदतीतसाठी सरसावत आहेत. मात्र आर्थिक मदत करण्यात अक्की अक्षय कुमारने सा-यांनाच मागे टाकले आहे. सर्वाधिक रक्कम निधीत देणारा अक्की हा पहिला अभिनेता ठरला आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारकोरोना वायरस बातम्याट्विंकल खन्नाट्विटरपंतप्रधान