Join us  

अँजेलिना जोलीचा ‘चेहरा’ मिळवण्यासाठी धडपडणा-या इराणी मॉडेलला कोरोना, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:52 AM

होय, अँजेलिनासारखा चेहरा हवा म्हणून या बयेने  एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 वेळा चेह-याची सर्जरी केली.

ठळक मुद्देमध्यंतरी सहरने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे अनेक फोटो   इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्यावर अनेकजण जीव ओवळतात. जगभर तिचे कोट्यवधी चाहते आहे. पण म्हणून  अँजेलिनासारखे दिसायचे असा अट्टाहास करणा-या बयेला काय म्हणायचे? होय, या बयेने नेमके तेच केले. होय, अँजेलिनासारखा चेहरा हवा म्हणून या बयेने  एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 वेळा चेह-याची सर्जरी केली. तिची ही सर्जरी पूर्णपणे अपयशी ठरली आणि ती भलतीच दिसू लागली, हा भाग अलहिदा. आता याच बयेला कोरोणाची लागण झाली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय.

सहर असे तिचे नाव. तिचे खरे नाव फातिमा किश्वंद आहे. ती एक इराणी मॉडेल आहे. गतवर्षी चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती तुरुंगात आहे. तुरुंगातच तिला कोरोनाची लागण झाल्याचे कळतेय. व्हेंटिलेटवर असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आता तिच्या वकीलांनी तिला पॅरोलवर सोडण्याची माणगी केली आहे. तूर्तास ती मागणी नाकारण्यात आली आहे.

सहरने अँजेलिनासारखा चेहरा मिळवण्यासाठी स्वत:च्या चेह-यावर ५० शस्त्रक्रिया केल्यात. मी अँजेलिनाची जगातील सर्वांत मोठी चाहती आहे, हा खुद्द सहरचा दावा आहे. मी अँजेलिनासारखी दिसावी, ही माझी एकच इच्छा आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते, असे ती म्हणायची. केवळ म्हणायची नाही तर यानंतर तिने अँजेलिनासारखा चेहरा मिळवण्यासाठी स्वत:च्या चेह-यावर ५० शस्त्रक्रिया केल्यात. याशिवाय कडक डाएटही फॉलो केले. जेणेकरून तिचे वजन 40 किलोंच्या वर जाणार नाही. 

मध्यंतरी सहरने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे अनेक फोटो   इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. काहींनी  सहरने दाखविलेल्या धैयार्चे कौतुक केले होते तर काहींनी तिला मुर्खात काढले आहे. शिवाय तिला ट्रोल केले होते.  अर्थात सहरला यामुळे काहीही फरक पडत नाहीच. कारण अँजेलिनासारखे दिसणे, केवळ याचाच तिला ध्यास आहे. पण आता हीच सहर कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहे.

टॅग्स :अँजोलिना जॉलीहॉलिवूडकोरोना वायरस बातम्या