Join us  

'मन्नत'बंगल्यात राहणारा शाहरुख आधी राहायचा भाडाच्या घरात, चंकी पांडेने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:42 AM

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे हा शाहरुख खानचा जुना मित्र आहे. दोघंही फॅमिली फ्रेंड आहेत.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunkey Pandey) हा शाहरुख खानचा (Shahrukh Khan)  जुना मित्र आहे. दोघंही फॅमिली फ्रेंड आहेत. चंकीची पत्नी भावना आणि शाहरुखची पत्नी गौरी चांगल्या मैत्रिणी आहेत. तर दोघांच्या मुली अनन्या पांडे आणि सुहाना खान यांचाही खास बाँड आहे. नुकतंच चंकी पांडेने एका पॉडकास्टमध्ये शाहरुखसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. जेव्हा शाहरुख आणि गौरी भाड्याच्या घरात राहायचे त्यावेळचा किस्साही त्याने शेअर केला.

'टाईम आऊट विद अंकित' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडे म्हणाला,  " शाहरुखच्या सुरुवातीच्या काळात तो नेहमी माझ्या भावाकडे चिक्कीकडे यायचा. आम्ही आजही चांगले मित्र आहोत. तेव्हा शाहरुख आणि गौरी भाड्याच्या घरात राहायचे. तेव्हा तो आम्हाला बऱ्याचदा भेटायला यायचा. आम्ही घरात बसून व्हिडिओ कॅसेट्स लावून बघायचो. माझ्याही घरी दोघं अनेक यायचे."

तो पुढे म्हणाला, "तेव्हा मला शाहरुखकडे बघून असंच वाटायचं की हा मुलगा नक्की सुपरस्टार होणार. कारण त्याच्यात ते टॅलेंट होतं. आज तुम्ही बघतच आहात. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास होता आणि पुढे काय करायचंय हे त्याला चांगलं माहित होतं. मी त्याला ओळखतो याचा मला अभिमान वाटतो. त्याच्यात थोडाही बदल झालेला नाही."

शाहरुख आणि गौरीने काही महिन्यांपूर्वीच चिक्की पांडे यांच्या लेकीच्या अलानाच्या लग्नात हजेरी लावली होती. दोघांनी तिच्या संगीतमध्ये डान्सही केला. हे दोन्ही कुटुंब अनेकदा एकत्र पाहायला मिळतं. सध्या या कुटुंबातील स्टारकीड्सही मनोरंजनसृष्टी गाजवत आहेत.

टॅग्स :चंकी पांडेशाहरुख खानगौरी खानबॉलिवूड