Join us  

सुपरस्टारसोबत काम, मोठीने त्याच्याशीच केलं लग्न तर धाकटीचा मृत्यू; कोण आहेत या बहिणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 7:00 AM

सोशल मीडियावर कलाकारांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर कलाकारांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. फोटोमधून खरं तर त्यांची ओळख पटणंही कठीण होतं. असाच एक दोन बहिणींचा फोटो आता व्हायरल होतोय. या फोटोतील दोन्ही बहिणींनी एकाच सुपरस्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर एका बहिणीचं त्याच सुपरस्टारसोबत लग्न झालं तर दुसऱ्या बहिणीचा मृत्यू झाला. कोण आहेत या बहिणी?

फोटोत दिसणाऱ्या या बहिणी खूपच क्यूट दिसत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट काळातील हा फोटो आहे. एकीने दोन वेण्या घातल्या आहेत तर दुसरीने वर पोनी बांधली आहे. यांच्यातील मोठ्या बहिणीने सुपरस्टारसोबतच लग्न केले होते. मात्र लग्नानंतर अनेक वर्षांनी ते विभक्त झाले. तिचं नाव नंतर सनी देओलसोबतही जोडलं गेलं. तर छोट्या बहिणीनेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं पण तिला मोठ्या बहिणीप्रमाणे यश मिळालं नाही. सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर ती फॅशन डिझायनिंगकडे वळली. मात्र तिच्या नशिबात वेगळंच होतं. कॅन्सरने तिचा मृत्यू झाला.

कोण आहेत या बहिणी?

फोटोत दिसणाऱ्या या बहिणी आहेत डिंपल कपाडिया आणि सिंपल कपाडिया. डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले. काही वर्षांनी दोघं वेगळे झाले. डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिनेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले मात्र नंतर तिने अक्षय कुमारसोबत लग्न करुन सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. तर डिंपल यांची लहान बहीण सिंपल कपाडियाने 1977 साली आलेल्या 'अनुरोध' सिनेमातून राजेश खन्ना यांच्यासोबत पदार्पण केले. पण तिचं करिअर फार काळ टिकलं नाही आणि नंतर तिचा कॅन्सरने मृत्यू झाला.

टॅग्स :डिम्पल कपाडियाराजेश खन्नापरिवारबॉलिवूड