Join us  

अभिमानास्पद! झेप क्षितीजाची; साऊथस्टार महेशबाबूच्याही चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 1:52 PM

चांद्रयान ३ या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे.

मुंबई - भारतासह अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेला सुरुवात झाली असून भारतीयांना या मोहिमेबद्दल जेवढे कुतूहल आहे, तेवढाच अभिमानही. म्हणूनच भारतभरात या मोहिमेसाठी प्रार्थना आणि इस्रोचे अभिनंदन करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, मोदींनीही ट्विट करुन आजचा दिवस भारतीयांना सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असे म्हटले आहे. तर, दिग्गज कलाकार आणि राजकीय नेत्यांकडून चंद्रयान ३ मोहिमेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. साऊथ स्टार महेश बाबूनेही ट्विट करुन आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.

चांद्रयान ३ या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे. मात्र, मोहिमेदरम्यान कोणत्या गोष्टी अपयशी ठरू शकतात, त्यासंदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर भर दिला असल्याचे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यापूर्वीच सांगितले. आज चंद्रयान ३ चे उड्डाण होत असून देशवासीयांकडून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनीही गुरुवारी तिरुपती वेंकटाचलापथी मंदिरात चंद्रयान ३ चं प्रतिकृती मॉडेल घेऊन पूजा-आरती केली. तसेच, या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थनाही केली. 

राजकीय नेत्यांसह बॉलिवूडचे कलाकारही या मोहिमेसाठी इस्रोला शुभेच्छा देत आहेत. तसेच, इस्रोचा आणि चंद्रयान ३ मोहिमेचा आम्हाला अभिमान असल्याचं ते सांगत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टविट करुन मोहिमेला शुभेच्छा देत हा सुवर्ण क्षण असल्याचं म्हटलं आहे. तर, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. साऊथ स्टार महेश बाबू यानेही ट्विट करुन इस्रोचा अभिमान वाटतो, मोठ्या क्षितीजाकडे आणखी एक झेप म्हणत शुभेच्छाही दिल्या आहेत. 

मोठ्या क्षितिजाकडे झेप, आणखी एक महत्त्वपूर्ण प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण उत्साही असल्याचं महेश बाबूने म्हटले. तसेच, आज #Chandrayaan3 लाँच केल्याबद्दल ISRO मधील तेजस्वी टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा, तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो, असेही महेशबाबूने म्हटले आहे. 

मोदींनीही केलं ट्विट १४ जुलै २०२३ हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्रात सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. चंद्रयान-३ ही आपली तिसरी चंद्र मोहीम आपल्या प्रवासाला सुरुवात करतत आहे. हे उल्लेखनीय मिशन अंतराळात आपल्या देशाची स्वप्ने आणि आशा-आकांक्षा घेऊन झेप घेत आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे.  

टॅग्स :चांद्रयान-3महेश बाबूबॉलिवूडभारतनरेंद्र मोदी