Join us  

हसायला तयार व्हा...'चला हवा येऊ द्या' चं कमबॅक, पण झालाय 'हा' मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:09 PM

निलेश साबळेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yeu Dya) ने काही दिवसांपासून ब्रेक घेतला होता. कार्यक्रम बंद झाला अशीच चर्चा रंगली असताना आता हवा येऊ द्याचे कलाकार पुन्हा आले आहेत. सूत्रसंचालक डॉ निलेश साबळेने (Dr Nilesh Sable) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भाऊ कदम हातात फलक घेऊन 'मी पुन्हा येतोय...मी पुन्हा येतोय' असं म्हणत आहे. 

गेल्या ९ वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे असे अनेक कलाकार यामधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रम काही काळ ब्रेक घेत असल्याचं समोर आलं. निलेश साबळेची पोस्टही व्हायरल झाली. यामुळे चाहते निराश झाले होते. पण आता काही काळाच्या विश्रांतीनंतर कार्यक्रम परत येतोय. निलेश साबळेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भाऊ कदम म्हणतो,'मी पु्न्हा येतोय..मी पुन्हा येतोय.. आणि शेवटचं पान महत्वाचं..चला हवा येऊ द्या..आता फक्त सोमवार शनिवार दोनच दिवस नाही तर सोमवार ते शनिवार संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.'

चला हवा येऊ द्या परत सुरु होणार म्हणल्यावर चाहतेही खूश झालेत. पुन्हा एकदा निलेश साबळेचं 'कसे आहात मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे' हे ऐकायला मिळणार आहे. तेही आठवड्यातून सहा दिवसशो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदमटिव्ही कलाकारझी मराठी