Join us

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला मात दिलेले आणि झुंज देत असलेले सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 14:49 IST

चला जाणून घेऊया आतापर्यंत कुणी या आजाराशी लढाई करत या आजाराला मात दिली आणि कोण या आजाराशी दोन हात करत आहेत. 

बॉलिवूड अभिनेते किंवा भारतात असे काही सेलिब्रिटी आहे ज्यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं होतं. यातून काही सेलिब्रिटी सुखरुप बाहेर आले तर काही सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला. आता सध्याही काही सेलिब्रिटी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी सामना करत आहेत. चला जाणून घेऊया आतापर्यंत कुणी या आजाराशी लढाई करत या आजाराला मात दिली आणि कोण या आजाराशी दोन हात करत आहेत. 

सोनाली बेंद्रे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी दिली. सोनाली ने सांगितले की, तिला सध्या एका हायग्रेड कॅन्सरने ग्रासले असून ती या आजाराशी झुंज देत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या आजारावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.

इरफान खान 

काही दिवसांपूर्वीच अभिनेता इरफान खान यानेही त्याला कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. इरफान खान याला न्यूरो-एंडोक्राइन नावाच कॅन्सर झाला आहे. सध्या तो सुद्धा लंडनमध्ये या आजारावर उपचार घेत आहे. 

मनिषा कोयराला

२०१२ साली अभिनेत्री मनिषा कोयराला हिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचं कळालं होतं. यानंतर १० डिसेंबर २०१२ रोजी मनिषा उपचारासाठी परदेशात गेली. उपचारानंतर तिचा आजार बरा झाला. गेल्या काही वर्षांपासून मनिषाही कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे.

युवराज सिंग

२०११ साली वर्ल्डकपमध्ये खेळत असताना युवराज सिंगला रक्ताच्या उलट्या आणि श्वसनाचा त्रास होत होता. अमेरिकेला जाऊन उपचार घेतल्यानंतर युवराजचा कॅन्सर बरा झाला. मार्च २०१२ ला युवराज भारतात परतला आणि क्रिकेटमध्येही त्याने वापसी केली.

अनुराग बसु

‘बर्फी’ सिमेमाचे दिग्दर्शक अनुराग बसु यांना २००४ साली रक्ताचा कॅन्सर झाला होता. या आजारातून वाचण्याची फक्त ५० टक्के वाचण्याची शक्यता होती. मात्र उपचारानंतर त्याचा आजार बरा झाला.

लिजा रे

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री लिसा रे काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण ती एकाएकी सिने इंडस्ट्रीतून बाहेर पडली. कारण 2009 मध्ये तिला प्लाज्मा सेल्सचा कॅन्सर झाला होता. पण या जीवघेण्या आजारासोबत तिने संघर्ष केला आणि त्यातून बाहेर आली. 

मुमताज

आपल्या अदाकारी एकेकाळी प्रेक्षकांवर जादू करणारी अभिनेत्री मुमताज हिला ब्रेस्ट क्रन्सरने ग्रासले होते. 2000 साली त्यांना हा आजार झाला होता. या आजारातून बाहेर यायला तिला बरीच वर्ष लागली. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीकर्करोगआरोग्य