Join us

रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 14:47 IST

रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा होताना दिसते आहे.

रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, आनंदी राहण्यासाठी मला कारण लागत नाही.

रिंकूने शेअर केलेल्या फोटोत निळ्या रंगाचा वन पीस घातला आहे आणि पायात स्पोर्ट शूज घातलेले दिसत आहेत. तिच्या या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.

या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूअमिताभ बच्चन