Join us  

Cannes 2023: रेड कार्पेटवर सनीचा जलवा; हाय स्लिट आऊटफिटमध्ये वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 7:52 PM

Sunny leone: सनीने कान्सच्या पहिल्याच दिवशी साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. कान्समध्ये सहभागी होण्यासाठी सनीने ग्रीन कलरचा स्टायलिश आऊटफिट निवडला होता.

सध्या सोशल मीडियावर Cannes 2023 ची जोरदार चर्चा आहे.  Cannes च्या रेड कार्पेटवरील अनेक अभिनेत्रींचे हटके लूक व्हायरल झाले आहेत. अलिकडेच सारा अली खान (sara ali khan) आणि मृणाल ठाकूर( mrunal thakur) यांनी केलेल्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, या अभिनेत्रींना मागे टाकत आला सनी लिओनीच्या (Sunny Leone) लूकची चर्चा होऊ लागली आहे. 

सनीने कान्सच्या पहिल्याच दिवशी साऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. कान्समध्ये सहभागी होण्यासाठी सनीने ग्रीन कलरचा स्टायलिश आऊटफिट निवडला होता. सनीने वन-शोल्डर आणि स्लिस्ट गाऊन परिधान केला होता. तर, दुसऱ्या दिवशी तिने क्लासिक ब्लॅक-अँड-व्हाइट कॉम्बिनेशन असलेला ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपसह  स्लीक व्हाईट पँट परिधान केली होती. 

दरम्यान, सनी तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "केनेडी" च्या प्रमोशनसाठी कान्समध्ये सहभागी झाली आहे. हा सिनेमा यावर्षी मिडनाईट स्क्रिनिंगसाठी निवडला गेलेला एकमेव भारतीय चित्रपट आहे. 

टॅग्स :सनी लिओनीकान्स फिल्म फेस्टिवलसेलिब्रिटीसिनेमासारा अली खानमृणाल ठाकूर