प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील गुणी आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगणा, कवियित्री आणि व्यावसायिकदेखील आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसते आहे. याशिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देते. नुकतेच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ती पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. कारण तिने तिच्या पोस्टमध्ये मुंबईला बाय बाय केलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली. तिने एअरपोर्टवरील एक फोटो पोस्ट करत त्यावर "बाय बाय मुंबई. मला तुझी खूप आठवण येईल. मी लवकरच परत येईन..." असे भावनिक कॅप्शन दिले आहे. तिच्या या एका पोस्टमुळे चाहते विचारात पडले आहेत की, प्राजक्ता नेमकी कुठे चालली आहे? अनेकांनी ती देवदर्शनासाठी किंवा बंगळुरूमधील आश्रमात गेली असावी, असे तर्कवितर्क लावत आहेत.
'हास्यजत्रा' टीममुळे गूढ उकलले!प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहते चिंतेत पडले होते. पण हे गूढ फार काळ टिकले नाही! थोड्याच वेळात प्राजक्ताने आणखी एक फोटो शेअर केला आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. या दुसऱ्या फोटोत तिच्यासोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम, ज्यात सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके दिसले. प्राजक्ताने स्पष्ट केले की, हे सर्वजण एका खास शोसाठी नागपूरला गेले आहेत. थोडक्यात, अभिनेत्रीचा हा प्रवास मनोरंजन आणि कामाच्या निमित्ताने नागपूरकडे होता.
Web Summary : Prajakta Mali's Instagram post sparked worry as she bid adieu to Mumbai. Later, a photo revealed she's traveling to Nagpur with the 'Maharashtrachi Hasyajatra' team for a special show, resolving fan concerns.
Web Summary : प्राजक्ता माळी के इंस्टाग्राम पोस्ट से चिंता बढ़ी क्योंकि उन्होंने मुंबई को अलविदा कहा। बाद में, एक तस्वीर से पता चला कि वह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीम के साथ एक विशेष शो के लिए नागपुर जा रही हैं, जिससे प्रशंसकों की चिंता दूर हो गई।