Join us

“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ कोटी देतो”; श्रीमंत बिझनेसमॅनच्या ऑफरवर मॉडेलचं जबरदस्त उत्तर, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:10 IST

रायनने ओलिवर जैकब मेलरसोबत लग्न केले होते. ओलिवर हा ब्रिटीश अभिनेता आणि पर्सनल ट्रेनरदेखील आहे.

ठळक मुद्देरायन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप डिस्टर्ब आहे. प्रेग्नेंसीवरून ती संघर्ष करत होती. आयवीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भवती राहायचं होतं परंतु त्यात ती यशस्वी झाली नाहीमागील काही दिवसांपासून मला लोकांचे प्रपोजल आणि ऑफर मिळत आहे

ब्रिटनची ग्लॅमर मॉडेल रायन शगडेन नेहमी तिच्या पोस्टवरून चर्चेत असते. अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. परंतु तीदेखील ताकदीनं या ट्रोलर्सना जसंच्या तसं उत्तर देते. बऱ्याचदा रायनला वैयक्तिक त्रासही सहन करावा लागला आहे. असाच काही किस्सा रायनने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. त्यात श्रीमंत उद्योगपतीकडून तिला आलेली ऑफर सांगितली आहे.

३४ वर्षीय रायनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे की, मागील काही दिवसांपासून मला लोकांचे प्रपोजल आणि ऑफर मिळत आहे. यामुळे मी सध्या त्रस्त झालीय. एका श्रीमंत उद्योगपतीने तर हद्दच केली. मला इनबॉक्समध्ये मेसेज केला आणि म्हणाला माझ्यासोबत एक रात्र घालव त्यासाठी तुला २ लाख पाऊंड्स म्हणजे २ कोटी देण्यासाठी तयार आहे असा दावा रायनने केला आहे.

रायनने सांगितले की, मी माझ्या चाहते आणि फॉलोअर्सच्या भावनांचा सन्मान करते. मला या गोष्टीशी काही देणंघेणं नाही हे त्यांनी समजून घ्यावं. अशाप्रकारे ऑफर्स देणाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेत राहिलं पाहिजे कारण कोणालाही अशाप्रकारे बोलण्याचा हक्क नाही. रायनने ओलिवर जैकब मेलरसोबत लग्न केले होते. ओलिवर हा ब्रिटीश अभिनेता आणि पर्सनल ट्रेनरदेखील आहे. ओलिवरने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या कोरोनेशन स्ट्रीटमध्ये डॉक्टर मॅट कार्टरची भूमिका साकारली होती. या अभिनयाने तो चर्चेत राहण्यास यशस्वी ठरला होता.

दरम्यान, रायन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप डिस्टर्ब आहे. प्रेग्नेंसीवरून ती संघर्ष करत होती. त्यासाठी रायनने हॉर्मोन इंजेक्शन घेतली आहे. तिला आयवीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भवती राहायचं होतं परंतु त्यात ती यशस्वी झाली नाही. रायनने तिला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, तो काळा माझ्या आयुष्यातील सर्वात संघर्षमय होता.  

टॅग्स :इन्स्टाग्राम