Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झलक' जॅकलिनची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 13:00 IST

डान्स रियालिटी शो झलक दिखला जा आणि मलायका अरोरा-खान हे समीकरण गेल्या काही वर्षापासून बनलं आहे. मलायकाचा जज करण्याचा ...

डान्स रियालिटी शो झलक दिखला जा आणि मलायका अरोरा-खान हे समीकरण गेल्या काही वर्षापासून बनलं आहे. मलायकाचा जज करण्याचा अंदाज आणि अदा यामुळं रसिकही फिदा झाले होते.मात्र यंदाच्या सीजनमध्ये झलकच्या फॅन्सचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण 'झलक दिखला जा'  या डान्स रियालिटी शोमध्ये आता मलायका अरोरा-खान जजच्या खुर्चीवर दिसणार नाही. मलायकानं या शोची जज म्हणून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.मलायकानं शो सोडल्यानंतर आता तिची जागा कोण घेणार याची उत्सुकता रसिकांना लागली होती. मलायकाच्या जागी आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस शोचं जज म्हणून जबाबदारी पार पाडेल अशी चर्चा सध्या सुरु आहे.त्यामुळं 'झलक दिखला जा' मध्ये जॅकलिनच्या डान्सची झलकही रसिकांना अनुभवता येणार आहे..