Join us

झिवाचा राष्ट्रध्वजाला असा ‘सॅल्यूट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:16 IST

महेंद्रसिंग आणि साक्षी यांची मुलगी झिवा हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला वंदन केले. सॅल्यूट करतांनाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यात आला आहे.

 भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आता एक बायोपिक येणार आहे. विविध भाषांमध्ये चित्रपटाचे ट्रेलर्स लाँच करण्यात आले आहेत. महेंद्रसिंग आणि साक्षी यांची मुलगी झिवा हिने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला वंदन केले.सॅल्यूट करतांनाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्यात आला आहे. अतिशय क्युट असा हा व्हिडीओ असून महेंद्रसिंगने तिला सॅल्यूट करायचे शिकवल्याचे कळते आहे. सध्या धोनी बायोपिक ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याची भूमिका चित्रपटात सुशांतसिंग राजपूतने केली आहे.