झू झू भारतात येता येता राहिली...! हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 14:30 IST
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ सध्या जाम चर्चेत आहे आणि असणार का नाही? यात सलमान खान जो आहे. या चित्रपटात ...
झू झू भारतात येता येता राहिली...! हे आहे कारण!!
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ सध्या जाम चर्चेत आहे आणि असणार का नाही? यात सलमान खान जो आहे. या चित्रपटात सलमानसोबत प्रथमच चीनी अभिनेत्री झू झू झळकणार आहे. खरे तर ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनसाठी झू झू भारतात येणार म्हणून, चाहते उत्सूक होते. पण कदाचित असे नाहीय. झू झू भारतात येणार होती. पण आता तिने हा प्लान रद्द केलाय.खुद्द कबीर खानने ही बाब स्पष्ट केली आहे. झू झू भारतात येणार होती. आम्हीही तिच्या भारत दौºयाबद्दल कमालीचे उत्सूक होतो. तिच्या येण्याचे सगळे प्लानिंगही झाले होते. पण आता ‘ट्यूबलाईट’ रिलीज होण्यास केवळ पाच दिवस राहिले आहेत. अशात तिचे येणे अशक्य आहे. ती आपल्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनसाठी येऊ शकली नाही, असे कबीर खानने स्पष्ट केले.काल सोमवारी ‘ट्यूबलाईट’च्या संपूर्ण टीमने या चित्रपटातील लिटिल मास्टर मार्टिन रे टंगू याला मीडियासमोर सादर करण्यात आले. यावेळी कबीर अंकलला विचार की, मला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये का सहभागी करून घेतले नाही? असे सलमान मार्टिनला म्हणाला. मार्टिनने खरोखरच हा प्रश्न कबीरला विचारला. यावर कबीर काय म्हणाला माहितीय? बेस्ट को हमेशाही लास्ट में रखते है, असे कबीर म्हणाला. मार्टिनप्रमाणेच झू झू ही सुद्धा या चित्रपटाचा बेस्ट पार्ट आहे, असेच म्हणायला हवे. कारण ती तर मार्टिनपेक्षाही ‘लास्ट’ दिसणार आहे. म्हणजे एकदम चित्रपट रिलीज झाल्यावरच. आहे ना मजेशीर...!ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे. त्यावेळी झू झू आपल्याला भेटेलच. तोपर्यंत प्रतीक्षा!!