Join us  

70 च्या दशकातही सर्वात बोल्ड ठरली होती 'ही' अभिनेत्री, वयाच्या 68 व्या वर्षीही दिसते इतकी सुदंर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:02 PM

1971 साली देवानंद यांचा मुख्य भूमिका असलेला 'हरे राम हरे कृष्णा' सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला आणि सिनेमातून जीनत अमान ख-या अर्थाने प्रकाशझोतात आल्या.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांच्यावर चाहते आजही त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत. त्यांनी केलेल्या सिनेमापैकी 'सत्यम शिवम सुंदरम' मधला त्यांचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. आज जीनत अमान यांचा वाढदिवस आहे. 19 नवम्बर 1951 मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला. आज 68 वा वाढदिवस जीनत अमान सेलिब्रेट करत आहेत. जीनत अमान यांना लहाणपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. लॉस एंजिल्स मध्ये जीनत यांचे शिक्षण झाले आहे.

 जीनत यांनी 'हलचल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरूवातीला त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल करू शकले नाहीत. मात्र 1971 साली देवानंद यांचा मुख्य भूमिका असलेला 'हरे राम हरे कृष्णा' सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकला आणि सिनेमातून जीनत अमान ख-या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. याच सिनेमातून त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. जीनत अमान यांनी 70 च्या दशकात साकारलेल्या बोल्ड भूमिकांमुळेच त्या काळातल्या सर्वात बोल्ड आणि बिनधास्त  अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.

लवकरच पुन्हा एकदा जीनत अमान रूपेरी पडद्यावर दमादार एंट्री करणार आहेत. 'पानिपत' सिनेमात होशियारगंजमधील सकिना बेगम यांची भूमिका त्या साकारणार आहेत. विशेष म्हणजे जीनत  यांनी  आशुतोष गोवारिकरसह १९८९ साली प्रदर्शित झालेला ‘गवाही’ सिनेमामध्ये एकत्र काम केले होते.

'पानिपत'च्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. येत्या ६ डिसेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक कथानक असलेल्या या सिनेमाविषयी रसिकांमध्येही अधिक उत्सुकता आहे. 

टॅग्स :झीनत अमानपानिपत