जान्हवी कपूरचा ‘हा’ झकास अंदाज होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:20 IST
सध्या बी-टाउनमध्ये जान्हवी कपूर भलतीच चर्चेत आहे. तिच्या एकाच फोटोशूटमुळे सर्वत्र धूम उडाली आहे. सोशल मीडिया तर जान्हवीमय झाला आहे.
जान्हवी कपूरचा ‘हा’ झकास अंदाज होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ!
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. परंतु त्याअगोदरच ती स्टार बनताना दिसत आहे. नेहमीच ती कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असते. कधी तिचे फोटो व्हायरल होतात, तर कधी तिचे व्हिडीओ व्हायरल होतात. नुकतेच तिने करिअरमधील पहिले फोटोशूट केले. हे फोटोशूट तिने वोग मॅग्जीनसाठी केले होते. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिचा अंदाज बघण्यासारखा होता. या शूटचा एक व्हिडीओ सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फोटो काढताना जबरदस्त पोज देताना दिसत आहे. विशेष म्हणजे जान्हवीच्या या फोटोशूटमध्ये तिची लहान बहीण खुशी कपूरही दिसत आहे. या व्हिडीओच्या अखेरीस जान्हवी खुशीच्या गळ्यात पडताना दिसत आहे. या संपूर्ण फोटोशूटदरम्यान, जान्हवी कपूरचा आत्मविश्वास बघण्यासारखा आहे. तिचा अदा याकडे इशारा करतात की, भविष्यात बॉलिवूडमध्ये जान्हवीचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे. केवळ अभिनयच नाही तर तिची स्टाइलही तरुणाईला वेड लावणारी आहे. वोगच्या या फोटोशूटमध्ये फॅशन फोटोग्राफर प्रसाद नायक यांनी तिच्या अदा कॅमेºयात कैद केले आहे. दरम्यान, जान्हवी लवकरच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. सर्वांनाच तिच्या या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि जी स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर असणार आहे. या अगोदर तो ईरानी निर्माता माजित मजिदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लॉउड्स’मध्ये बघावयास मिळाला आहे.