Join us

मालदीव येथे हनिमून ट्रिपवर असलेल्या जहीर खान-सागरिका घाटगेने शेअर केलेले हे खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

सध्या अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू जहीर खान हे दाम्पत्य मालदीव येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या या रोमॅण्टिक ट्रिपचे काही फोटोज् सागरिका आणि जहीरने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यास चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सागरिका आणि जहीरने शेअर केलेले हे खास फोटो!!

सध्या अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू जहीर खान हे दाम्पत्य मालदीव येथे हनिमून एन्जॉय करीत आहेत. त्यांच्या या रोमॅण्टिक ट्रिपचे काही फोटोज् सागरिका आणि जहीरने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यास चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सागरिका आणि जहीरने शेअर केलेले हे खास फोटो!!जहीर आणि सागरिका काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकले.या दाम्पत्याने सुरुवातीला कोर्ट मॅरेज अन् नंतर ग्रॅण्ड रिसेप्शन दिले होते.सध्या हे क्यूट कपल मालदीव येथे हनिमून एन्जॉय करीत असून, या रोमॅण्टिक ट्रिपचे काही फोटोज् ते सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले त्यांचे फोटोज् चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जात आहेत.सागरिकाने शेअर केलेले काही फोटो तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.जहीरच्या एका फोटोला टेनिसपटू सानिया मिर्झाने कॉमेण्ट देत त्याची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता.तर सागरिकाने शेअर केलेल्या आणखी एका फोटोला यूजर्सनी उलटसुलट कॉमेण्ट दिल्याचे दिसून आले.सध्या या क्यूट कपलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.