Join us

​युवराज सिंगने खेचली सागरिका घाटगेची टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 19:19 IST

चक दे इंडिया या चित्रपटाद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या तिच्या व्यवसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवनासाठी जास्त चर्चेत आहे. ...

चक दे इंडिया या चित्रपटाद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या तिच्या व्यवसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवनासाठी जास्त चर्चेत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तिचे क्रिकेटर जहीर खानसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चा आहेत. युवराज सिंगच्या लग्नातदेखील तिने जहीर खानसोबत हजेरी लावली होती. सध्या अनेक ठिकाणी जहीर आणि तिला एकत्र पाहाण्यात येत आहे. तसेच सागरिकाने त्यांच्या नात्यबद्दल कबुली दिली नसली तरी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जहीरची तिच्या आयुष्यात महत्त्वाची जागा असल्याचे म्हटले होते. सागरिका घाटगेच्या इरादा या चित्रपटाचे स्क्रिनिंग नुकतेच झाले. या स्क्रिनिंगलादेखील जहीर खानने उपस्थिती लावली. पण या स्क्रिनिंगच्या आधी क्रिकेटर युवराज सिंगने सागरिकाची ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरून चांगलीच टर खेचली. इरादा हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटात नसिरुद्दीन शहा, अर्शद वारसी, शरद केळकर, दिव्या दत्ता, दिवाकर कुमार, रुमाना मोल्ला आणि सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत सागरिकाला युवराजने ट्विटवरून शुभेच्छा दिल्या आहेत पण त्याचसोबत तिची टरदेखील खेचली आहे. युवराजने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सागरिका तुला आजच्या प्रिमियरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तू जेव्हापासून क्रिकेट टीमच्या उपकर्णधाराला डेट करत आहेस तेव्हापासून तू माझ्या लक्षात आहेस. तुझी ती चॉईस खूपच छान होती. पण खऱ्या आय़ुष्यात असे काहीही करू नकोस. या त्याच्या ट्विटला सागरिकानेदेखील तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, युवराज मी तुझी आभारी आहे. मी कधीच माझे खरे आणि चित्रपटातील आयुष्य एकमेकांमध्ये मिसळू देत नाही. प्रिमियरला रात्री तुझी वाट पाहत आहे.