नागार्जुनच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वाचून तुम्ही अवाक् व्हाल; दाम्पत्य ४० दिवस जाणार हनिमूनला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 21:19 IST
साउथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू येत्या ६ आॅक्टोबर रोजी विवाहाच्या बंधनात अडकणार ...
नागार्जुनच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वाचून तुम्ही अवाक् व्हाल; दाम्पत्य ४० दिवस जाणार हनिमूनला!
साउथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू येत्या ६ आॅक्टोबर रोजी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्नुसार दोन दिवस चालणाºया या विवाह सोहळ्यात जवळपास दहा कोटी रुपये खर्च होणार आहेत. लग्नसोहळ्यातील सर्व विधी गोव्यातील डब्ल्यू हॉटेलमध्ये पार पडणार आहेत. हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे पार पडणार आहे. लग्नाचे कार्डदेखील समोर आले असून, सध्या या लग्नाची जय्यत तयारी केली जात आहे. लग्नानंतर समांथा आणि नागा चैतन्य त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करणार आहेत. त्यानंतर तब्बल ४० दिवसांच्या हनिमूनला जाणार आहेत. असेही म्हटले जात आहे की, दोघांचा हा हनिमुन दोन महिन्यांचा असू शकतो. तेथून परतल्यानंतर समांथा शिवकार्तिकेयनच्या अनटायटल्ड चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. समांथा याचवर्षी ‘राजू गरी गढी-२’ मध्येही बघावयास मिळाली होती. या चित्रपटात तिचा होणारा सासरा नागार्जुन बघावयास मिळाली. २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वल होता. वृत्तानुसार या लग्नसोहळ्यात जवळपास १५० गेस्ट सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये साउथ चित्रपटातील मोठमोठ्या स्टार्सचा समावेश आहे. समांथा फॉर्मल सेरेमनीसाठी क्रेश बजाज याने डिझाइन केलेला गाउन परिधान करणार आहे. तर ट्रेडिशनल वेडिंगदरम्यान नागा चैतन्यच्या आजीची साडी घालणार आहे. रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन हैदराबाद येथे करण्यात आले आहे. समांथाने सप्टेंबर २०१६ मध्ये नागासोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपची जाहीरपणे वाच्यता केली होती. वास्तविक हे जोडपं गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहे. एका मुलाखतीत समांथाने सांगितले की, इंडस्ट्रीत नागा हा तिचा पहिला मित्र बनला. पुढे बेस्ट फ्रेंड आणि आता लाइफ पार्टनर बनणार आहे. दरम्यान या दोघांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.