Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतचा ‘मोदी’ ड्रेस पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:58 IST

राखी सावंत या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधान तर कधी बिनधास्त अंदाज. आता राखी चर्चेत आहे ती तिच्या ड्रेसमुळे. होय, राखीचा ड्रेस पाहून तुम्हीही अवाक व्हाल

राखी सावंत या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधान तर कधी बिनधास्त अंदाज. आता राखी चर्चेत आहे ती तिच्या ड्रेसमुळे. होय, राखीचा ड्रेस पाहून तुम्हीही अवाक व्हाल. राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील काही फोटो तुमचे हमखास लक्ष वेधून घेईल. या डीप नेक ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रिंट केलेले आहेत. निश्चितपणे राखीचा हा ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी चाहती असल्याचेच यावरून दिसते. शिवाय राखीची राजकीय महत्त्वाकांक्षाही उघड होते. होय ना!!