Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा कपूरच्या लेकीच्या शिक्षणाचा खर्च ऐकून व्हाल थक्क! समायरा कपूरच्या युनिव्हर्सिटी फीची किंमत कोटींमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:44 IST

Karisma Kapoor Daughter Fees: करिश्मा कपूरची मुलगी समायरा अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.

दिवंगत उद्योजक संजय कपूरच्या मालमत्तेवरून मोठा वाद सुरू आहे. करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूर आणि तिच्या भावाने संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने संजयच्या मृत्युपत्राला चुकीचे ठरवले आहे. या प्रकरणावर दररोज सुनावणी होत आहे. मागील सुनावणीदरम्यान, करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूरने आरोप केला होता की, तिची दोन महिन्यांची फी अजून भरण्यात आलेली नाही. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांना सांगितले होते की, अशा प्रकारचा मेलोड्रामा करू नका. आता प्रिया कपूरच्या वकिलांनी न्यायालयात समायराच्या फीची पावती सादर केली आहे.

प्रिया सचदेवचे वकील शैल त्रेहन यांनी अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. ज्यामध्ये मुलांची युनिव्हर्सिटी फी न भरल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यांनी प्रति सेमिस्टर ९५ लाख रुपये फी भरल्याची पावती सादर केली आहे. वकिलांनी पावतीवरून हे निश्चित केले आहे की, फी आधीच भरण्यात आली आहे आणि पुढील हप्ता दुसऱ्या सेमिस्टरसाठी डिसेंबरमध्ये भरायचा आहे.

समायरा कुठे शिकते?समायरा कपूरच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने सुरुवातीचे शिक्षण 'अमेरिकन स्कूल ॲाफ बॉम्बे'मधून घेतले आहे. सध्या ती अमेरिकेतील टफ्ट्स युनिव्हर्सिटी, मॅसॅच्युसेट्स येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. करिश्मा कपूरची मुलगी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तिचे सोशल मीडिया अकाउंटही प्रायव्हेट आहे.

प्रियाने सुनावणीत काय म्हटले?प्रिया सचदेवने न्यायालयात सांगितले आहे की, पतीने आपली संपूर्ण संपत्ती पत्नीच्या नावावर करणे ही कोणतीही असामान्य गोष्ट नाही, उलट ही एक मजबूत परंपरा आहे जी त्यांच्या कुटुंबातही चालत आली आहे. प्रिया सचदेवच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, संजयच्या वडिलांनीही त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची संपूर्ण संपत्ती पत्नी राणी कपूरच्या नावावर केली होती. त्याचप्रमाणे संजय कपूर यांच्या मृत्युपत्रातही त्यांची पत्नी प्रिया यांना वारसदार बनवले आहे, त्यामुळे यात शंका घेण्यासारखे काही नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Karishma Kapoor's Daughter's Education Costs Crores Amidst Inheritance Dispute

Web Summary : Karishma Kapoor's daughter, Samaira's university fees are in crores. A court case revealed her fees at Tufts University are substantial, with receipts showing payments of ₹95 lakhs per semester amidst an inheritance dispute involving her late father's property.
टॅग्स :करिश्मा कपूर