Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा करीनाने साराला विचारला,प्रियकरासोबत कधी एक रात्री घालवली आहे का? यावर तिला मिळाले होते हे उत्तर, वाचून व्हाल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:17 IST

करिना सावत्र आई असली तरी मी तिला छोटी माँ म्हणून कधीही हाक मारणार नाही तिला ते अजिबातच आवडणार नाही असंही सारा गंमतीनं सांगितले होते. 

छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सिनेमात झळकण्यापूर्वीच तिच्या बॉलिवूड एंट्रीच्या चर्चा सुरू झाल्याने लोकप्रियता वाढत होती. रूपेरी पडद्यावर झळकल्यानंतर ती लाखों दिलों की धडकनच बनली आहे.

सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत आहे. साराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. त्यातही तिचं आणि करीना कपूरचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. साराने दिलेल्या मुलाखतीत करीनाविषयीच्या नात्यावर चर्चा केली होती. 

करीना माझी सावत्र आई आहे हे मला वडिलांनीच सांगितलं होतं. पण करीनाला माझी चांगली मैत्रीण व्हायचं आहे तिनं हे फार पूर्वीच मला सांगितलं होतं. ती सावत्र आई असली तरी मी तिला छोटी माँ म्हणून कधीही हाक मारणार नाही तिला ते अजिबातच आवडणार नाही असंही सारा गंमतीनं सांगितले होते. 

करीना आणि सारा दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं.त्यानंतर करिनानेही तैमुरला जन्म देत बॉलिवूडपासून ब्रेक घेत संसारात रमली. 

मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की, आपल्याला लग्न करायला हवे, असे सैफने मला दोनदा सुचवले होते. पहिल्यांदा त्याने ही गोष्ट ग्रीसमध्ये असताना सांगितली. त्यानंतर लडाखला असताना पुन्हा एकदा त्याने लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावेळी माझी भूमिका ‘मला माहिती नाही’ अशी होती. कारण मी त्याला पूर्णत: ओळखत नव्हती. त्यामुळे मला काही कळतच नव्हते.

मी खूप संभ्रमात होते. यामुळे तेव्हा मी त्याला नकार दिला. हा नकार त्याला अजून चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी होता. मी सैफसह केलेले लग्न माझ्या आयुष्यातील चांगला निर्णय समजते.

टॅग्स :सारा अली खानकरिना कपूर