Join us

सुशांत सिंग राजपूतसाठी सरोज खान यांनी केलेली शेवटची इंस्टाग्राम पोस्ट वाचून व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:15 IST

14 जूनला सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर सरोज खान यांनी इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर केली होती.  

बॉलिवूडच्या  प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे कार्डिएक अरेस्टमुळे मुंबईत निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत 2000हून जास्त बॉलिवूडच्या सुपरहिट गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. सरोज खानच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तुम्हाला माहित आहे का सरोज खान यांनी 14 जून रोजी इंस्टाग्रामवर सुशांत सिंग राजपूतसाठी शेवटची पोस्ट केली होती. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्या खूप दुःखी होत्या आणि आता त्यांची ही इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

14 जूनला सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर सरोज खान यांनी इंस्टाग्रामवर सुशांतचा फोटो शेअर करत लिहिले की, मी तुझ्यासोबत कधी काम केले नाही. सुशांत सिंग राजपूत पण आपण बऱ्याच वेळा भेटलो आहे. तुझ्या जीवनात काय अशी समस्या होती ? तू आपल्या आयुष्यात इतका कठोर पाऊल उचलले यामुळे मला धक्का बसला आहे. तू तुझ्या मोठ्या व्यक्तींसोबत बोलू शकत होता. त्यांनी तुझी मदत केली असती आणि तुला आनंदी पाहू शकले असते. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो आणि मला माहित नाही की तुझे वडील व बहिणींवर काय परिस्थिती ओढावली असेल. यावेळी माझ्या संवेदना आहेत. आम्ही तुझ्या सर्व सिनेमांना प्रेम दिले आणि नेहमीच प्रेम करत राहू. RIP

सरोज खान यांच्या पोस्टमधून लक्षात येते की त्यांना सुशांत आणि त्याचे काम खूप आवडत होते.

सुशांतदेखील चांगला डान्सर होता पण त्याला सरोज खान यांच्यासारख्या दिग्गज कोरियोग्राफरसोबत काम करता नाही आले. कदाचित त्यामुळे सरोज खान यांना देखील सुशांतच्या निधनामुळे वाईट वाटले असेल.

टॅग्स :सरोज खानसुशांत सिंग रजपूत