Join us

आपल्या मुलांसाठी रितेश देशमुखचे हे ‘लयभारी’ काम, वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 13:34 IST

'लयभारी' मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आता दोन मुलांचा पिता बनलाय. त्यामुळे आपल्या कुटुंबासह मुलांची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव त्याला ...

'लयभारी' मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आता दोन मुलांचा पिता बनलाय. त्यामुळे आपल्या कुटुंबासह मुलांची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव त्याला झाली आहे. दोन मुलांचा पिता बनल्यामुळेच की काय आपल्या सिनेमांच्या निवडीबाबतही रितेश सिलेक्टिव्ह झाला आहे. नुकतंच त्याने धमाल या सिनेमाच्या सीरिजमधील तिसरा सिनेमा टोटल धमालमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. मात्र सिनेमाला होकार देत असतानाच डबल मिनिंगच्या डायलॉगला रितेशने नकार दिला आहे. 'ग्रेट ग्रँड मस्ती' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर डबल मिनिंगचे डायलॉग असणा-या सिनेमात काम करणार नसल्याचं रितेशनं म्हटलं होतं. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना शरमने मान खाली घालावी लागेल अशा सिनेमात काम करणार नाही असा निर्धार रितेशने केला होता. त्यामुळे टोटल धमाल हा सिनेमा पूर्णपणे कॉमेडी असेल आणि यांत कोणतेही डबल मिनिंग डायलॉग असणार नाहीत असं आश्वासन मिळाल्यानंतर रितेशनं या सिनेमात काम करण्यास होकार दिला. 2007 साली दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी धमाल हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला. 2011 साली याच सिनेमाचा सिक्वेल डबल धमाल हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. आता या सीरिजच्या तिस-या सिनेमाच्या रुपात इंद्र कुमार टोटल धमाल नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमात अभिनेता संजय दत्तऐवजी अजय देवगण झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही गाजलेली जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहे. आता 'टोटल धमाल' सिनेमाच्या निमित्ताने माधुरी आणि अनिल कपूरसह,17 वर्षांनंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी एकत्र येणार आहेत.जानेवारी महिन्यात मुंबईत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.पुढच्या वर्षी दिवाळीत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.