Join us

​असा संजय दत्त तुम्ही कधीच पाहिला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 11:29 IST

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याचे आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. म्हणून राजकुमार हिरानी यांना संजूबाबाच्या आयुष्यावर चित्रपट काढावा वाटला. ...

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याचे आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. म्हणून राजकुमार हिरानी यांना संजूबाबाच्या आयुष्यावर चित्रपट काढावा वाटला. (संजय दत्तच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा येतो आहे. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.) संजूबाबाच्या आयुष्यात काय काय घडले, हे सांगण्याची गरज नाहीच. आम्हालाही संजूबाबाचा भूतकाळ सांगण्यात जराही रस नाही. आज आम्ही संजूबाबाचा भूतकाळ नाही तर वर्तमान सांगणार आहोत. होय, हा वर्तमान म्हणजे संजूबाबाचा रोमॅन्टिक अंदाज. आजपर्यंत कुणीही संजूबाबाला पाहिले नसेल, असा त्याचा रिअल लाईफ रोमॅन्टिक अंदाज.मंगळवारी संजय दत्त त्याची पत्नी मान्यता हिच्यासोबत डिनर डेटवर गेला होता. या डिनर डेटवर संजय व मान्यता या दोघांनीही धम्माल मस्ती केली.ALSO READ :  ​संजय दत्तच्या बायोपिकसाठी अशी रूपं बदलणार रणबीर कपूर!केवळ एवढेच नाही तर या डिनर डेटनंतर एक फोटो सेशनही केले. हे फोटो संजयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘मी अ‍ॅण्ड मी अ‍ॅण्ड हर लाईफ 2.30स्रे, हॅड डिनर आफ्टर जेल, लव्ह यू जान, ’ असे कॅप्शन संजयने या फोटोंना दिले आहे. अन्य एका फोटोलाही त्याने असेच काहीसे गर्भित कॅप्शन दिले आहे. ‘मी आजही माझी प्रेमकहानी लिहितोय. कुणी माझ्यासाठी या फोटोला  कॅप्शन देणार?’ असे त्याने म्हटले आहे. आता या कॅप्शनचा नेमका अर्थ आम्हालाही कळलेला नाही. म्हणजे संजयला यातून काय सांगायचेय, हे आम्हाला ठाऊक नाही. कदाचित संजयने मान्यताला त्याच्या खास अंदाजात खास मॅसेज दिला असावा. संजयचा उद्देश काहीही असो, भूतकाळ विसरून संजय खºया अर्थाने आयुष्य जगू लागला आहे, हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. तुमचे काय मत आहे?