Join us

​तुम्हीही बघाच :‘डिअर जिंदगी’मधून डिलिट करण्यात आलेले ‘हे’ सीन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 17:24 IST

आलिया भट्ट आणि शाहरूख खान यांचा ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा रिलीज होऊन बरेच दिवस झालेत. पण यातील काही सीन्स आत्ता कुठे चर्चेत आले आहेत. होय, सध्या हे सीन्स वेगाने व्हायरल होत असून लोक अगदी आवडीने ते बघत आहेत.

आलिया भट्ट आणि शाहरूख खान यांचा ‘डिअर जिंदगी’ हा सिनेमा रिलीज होऊन बरेच दिवस झालेत. पण यातील काही सीन्स आत्ता कुठे चर्चेत आले आहेत. होय, सध्या हे सीन्स वेगाने व्हायरल होत असून लोक अगदी आवडीने ते बघत आहेत. आता या सीन्समध्ये असे काय आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर निश्चितपणे या सीन्समध्ये काही खास आहे. या सीन्सचे वैशिष्ट्य म्हणजे हे सीन्स चित्रपटात नाहीत.होय, हे चित्रपटातून डिलिट केले गेलेले सीन्स आहेत. म्हणजेच, हे सीन्स चित्रीत करण्यात आलेत. पण लोकांना आवडणार नाहीत, म्हणून ऐनवेळी चित्रपटातून डिलिट करण्यात आले.  योगायोग म्हणजे, आता याच सीन्सला लोकांचे प्रचंड लाईक्स मिळत आहेत. शाहरूख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या आॅफिशिअल यू ट्यूब अकाऊंटवरून हे सीन्स पोस्ट करण्यात आले आहेत. या तीन सीन्समध्ये आलिया अर्थात कायराच्या व्यक्तिरेखेवर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे हे सीन्स आणि त्यातील कायराला तुम्ही भेटायलाच हवे.२०१६ मध्ये म्हणजेच गतवर्षी आलेला ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. बॉक्सआॅफिसवरही चित्रपटाचे चांगले प्रदर्शन केले होते. या चित्रपटात एका मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण कालखंड दाखवला गेला आहे. चित्रपटात आलियाने कायरा या मुलीची तर शाहरूखने जहांगिर या मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारली आहे.   जीवनामधील प्रत्येक लहानसहान गोष्टीमध्ये आनंद कसा शोधायचा आणि कसे प्रफुल्लित राहायचे हे या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील आलियाच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली होती. आता चित्रपटाचा भाग नसणारे हे सीन्स पाहून तुम्ही नव्याने आलियाच्या प्रेमात पडणार, हे नक्की. तेव्हा बघा तर!!ALSO READ : ​​आलिया तुला झाले तरी काय?आलियाच्या आवाजात ‘लव्ह यू जिंदगी’