Yo Yo ...ही आहे हनी सिंगची पत्नी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 19:51 IST
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग हा मॅरिड की अनमॅरिड हे जणू काही कोडेच आहे. बºयाचवेळा हे कोडे ...
Yo Yo ...ही आहे हनी सिंगची पत्नी!
बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग हा मॅरिड की अनमॅरिड हे जणू काही कोडेच आहे. बºयाचवेळा हे कोडे सोडविण्याचाही प्रयत्न केला गेला; मात्र वेळोवेळी अतिशय चतुराईने याविषयाला बगल दिली गेली. आज आम्ही तुमच्यासमोर हे कोडे उगलडणार आहोत. हनी सिंगची पत्नी कोण याचा उलगडा करणार आहोत. वास्तविक बॉलिवूडमध्ये स्थिरावताना हनी सिंगने नेहमीच मॅरिड असण्याच्या विषयाला टाळले आहे. त्यामुळे बºयाचवेळा त्याच्या मॅरेज लाइफविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. काहींच्या मते तर तो अजूनही अनमॅरिडच असल्याचे बोलले गेले. परंतु तो अनमॅरिड नसून मॅरिड असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हनी सिंगने सहा वर्षांपूर्वीच त्याची चाइल्डहूड फ्रेंड शालिनी तलवार हिच्याबरोबर विवाह केला होता. नुकताच हनी सिंग याने त्यांच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये It's been six years now असे लिहिले आहे. हनी सिंग आणि शालिनी यांचा विवाह २३ जानेवारी २०११ रोजी झाला होता. तेव्हापासून या दोघांनी त्यांचे मॅरेज लाइफ इतरांपासून लपवून ठेवले होते. भलेही हनी सिंग याने त्याच्या करिअरला २००५ मध्ये सुरुवात केली असली तरी, तो लाइमलाइटमध्ये लग्नाच्या काही महिन्यानंतरच आला होता. हनी सिंगने गायिलेली बरीचशी गाणी बच्चे कंपनींमध्येही जबरदस्त पॉप्युलर आहेत. ‘ओडका, यो यो हनी सिंग’ हे रॅपर सॉँग आजही त्याच्या चाहत्यांच्या ओठावर असतात. आता हनी सिंग याच्या लग्नाविषयीचा उलगडा झाल्याने त्याच्या लेडिज फॅन्समध्ये निराशेचा सूर व्यक्त झाला नाही तरच नवल.