Join us

होय...आम्ही दोघे प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:06 IST

 कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या आगामी या चित्रपटाचा ट्रेलर ...

 कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे सध्या ‘बार बार देखो’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या आगामी या चित्रपटाचा ट्रेलर काल मुंबईत लाँच झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धार्थ आणि कॅटरिना यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल सांगतांना कॅट म्हणाली,‘ होय, आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहोत. खऱ्या आयुष्यातही आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.’ वेल, विश्वास बसत नसला तरीही हे स्वत: कॅटने म्हटले आहे. रणबीर आणि चक्क सलमानभाईला सोडून आता सिद्धार्थ सोबत कॅटचे अफेअर सुरू झाले आहे.हे खरं आहे की प्रमोशन स्टंट? वेल, हे तिलाच माहित. पण, नित्या मेहरा दिग्दर्शित चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.