करिनाच्या बाळाच्या नावाची खिल्ली उडवणा-यांवर असे बरसले ऋषी कपूर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 11:29 IST
करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर अली खान ठेवून जणू काही गुन्हा केलायं. ...
करिनाच्या बाळाच्या नावाची खिल्ली उडवणा-यांवर असे बरसले ऋषी कपूर !
करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर अली खान ठेवून जणू काही गुन्हा केलायं. सैफ आणि करिनाने आपल्या नवजात बाळाचे नाव तैमूर ठेवलं आणि सोशल मीडियावर तैमूर या नावावरून एकच वादळं उठलं. अनेकांनी सैफिनाच्या मुलाच्या या नावाची खिल्ली उडवली. काहींनी तैमूर या नावावर आक्षेप घेत, त्याबद्दलचा संताप बोलून दाखवला. अशावेळी करिना कपूरचे काका आणि अभिनेते ऋषी कपूर शांत राहणे शक्यच नव्हते. त्यांनी करिनाच्या बाळाच्या नावावर आक्षेप घेणा-यांचा twitterवर चांगलाच क्लास घेतला. ‘आपल्या बाळाचे नामकरण हा त्याच्या आई-वडिलांचा अधिकार असतो. यात लोकांनी नाक खुपसण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. करिनाच्या बाळाचे नाव काय असावे, याच्याशी तुमचे काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी बोलणा-यांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलाय. }}}}पण इतके करूनही लोकांची तोंड बंद झाली नाहीत. उलट ऋषी कपूरच्या या टिष्ट्वटवर आणखी आक्षेपार्ह प्रतिक्रिया पडल्या. यानंतर मात्र ऋषी कपूर जाम संतापले. पालक आपल्या मुलाचे इतके घाणेरडं नाव कसं काय ठेऊ शकतात? असे टिष्ट्वट एका व्यक्तिने केले. यावर ऋषी कपूर यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. ‘तू तुझे काम कर. तुझ्या मुलाचे नाव तर ठेवले नाहीयं ना. मग आक्षेप घेणारा तू कोण?’ असे सणसणीत उत्तर त्यांनी दिले. यापश्चातही एका व्यक्तीने तर तैमूर या नावावर चिंता व्यक्त करताना अतिरेक केला. लोक तैमूर या नावावर आक्षेप का घेत आहेत, यासाठी तुम्हाला तैमूर आणि औरंगजेबचा इतिहास वाचायला हवा. हा इतिहास वाचल्यावर तुम्हाला कळेल की या दोघांनी लोकांवर किती अत्याचार केला,असे हा व्यक्ति म्हणाला. यावर ऋषी आणखीच संतापले. अलेक्झांडर आणि सिकंदर काही संत नव्हते. ही जगभरातील सर्वाधिक लोकप्रीय नावांपैकी दोन नावे आहेत. तुला काय अडचण आहे? अशा शब्दांत त्यांनी या व्यक्तिला सुनावले. }}}}यानंतरही लोकांचे आक्षेपार्ह कमेंट्स थांबले नाही.हा सगळा प्रकार ऋषी कपूर यांच्या संयमाची परीक्षा पाहणारा होता. यानंतर मात्र त्यांचा संयम सुटला. तैमूर या नावावर आणखी चर्चा झाली तर तुम्हाला ब्लॉक केले जाईल, असा इशाराच त्यांनी आपल्या चाहत्यांना दिला. तेव्हा कुठे आक्षेपार्ह प्रतिक्रिया थांबल्या. }}}}