यशराज कंपूत नव्या हिरोईनची एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:37 IST
दिग्दर्शक हबीब फैसल यांचा ‘दावत-ए-इश्क’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला असला तरी त्यांच्या आगामी चित्रपटाची मात्र चांगलीच चर्चा ...
यशराज कंपूत नव्या हिरोईनची एंट्री!
दिग्दर्शक हबीब फैसल यांचा ‘दावत-ए-इश्क’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला असला तरी त्यांच्या आगामी चित्रपटाची मात्र चांगलीच चर्चा सुरू आहे. हबीबच्या आगामी चित्रपटात दिल्लीचा एक नवा कोरा चेहरा लीड रोलमध्ये दिसणार आहे. होय, हा नवा कोरा चेहरा म्हणजे दिल्ली गर्ल अनया सिंग. यानिमित्ताने अनयाची यशराज कंपूत एन्ट्री होतेयं. इतकेच नाही तर अनया सिंग सोबत यशराज बॅनरने तीन चित्रपटांचा करार केला आहे. आदित्य रॉय कपूर व परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हबीब फैसल यांचा ‘दावत-ए-इश्क’ बॉक्स आॅफिसवर कमाल करू शकला नाही. मात्र यशराज बॅनरने पुन्हा एकदा हबीबला संधी दिली आहे. हबीब दिग्दर्शित करीत असलेला आगामी चित्रपटात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेता अली जफरचा लहान भाऊ डॅनिअल जफर हा या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार होता. मात्र पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याच्या मागणीनंतर डॅनिअलच्या जागी रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन यांची निवड करण्यात आली. आदर हा राज कपूर यांची मुलगी रिना खन्ना हिचा मुलगा आहे. याच चित्रपटात अनया सिंग लीड हिरोईन म्हणून दिसणार आहे. या वृत्ताला कास्टिंग डायरेक्टर शानो शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,आदित्य चोप्रा नेहमीच फ्रेश चेहरा व टॅलेंटच्या शोधात असतात.आमच्या चित्रपटासाठी नायिकेचा शोध घेण्यासाठी आम्ही दिल्ली, चंडीगढ व उत्तर भारतातील शहरांत आॅडिशन घेतल्या. आमच्या टीमने घेतलेल्या टॅलेंट हंटमधून आम्हाला नवा चेहरा मिळाला. इंडस्ट्रीला नव्या चेहºयांची गरज आहेच. येथे अनेक संधी आहेत. अभिनेता रणवीर सिंग व अनुष्का शर्मा यांचीही अशाच टॅलेंट हंटमधून यशराज कंपूत एन्ट्री झाली होती, हे येथे सांगितले पाहिजेच.