Join us

​ यश आणि राधिका पंडित अडकले लग्नगाठीत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 18:03 IST

दाक्षिणात्य अभिनेता यश आणि अभिनेत्री राधिका पंडित हे दोघे आज शुक्रवारी (९ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बेंगळुरू ...

दाक्षिणात्य अभिनेता यश आणि अभिनेत्री राधिका पंडित हे दोघे आज शुक्रवारी (९ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बेंगळुरू येथे आयोजित एका शानदार सोहळ्यात हे  सेलिब्रिटी कपल विवाहबद्ध झाले. कर्नाटकच्या बड्या हस्तींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.‘नंदनगोकुल’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर यश व राधिका यांची भेट झाली होती. या मालिकेचा मुख्य अभिनेता सोडून गेल्याने यशला नशिबाने ही मालिका मिळाली आणि यशच्या आयुष्यात राधिका आली. यानंतर ‘मोगिना मनासू’ या चित्रपटात हे दोघे दिसले. यातही यश लीड रोलमध्ये नव्हता. पण इथेही नशिबाने त्याला साथ दिली. यश ऐनवेळी चित्रपटाचा हिरो म्हणून झळकला. करिअरसोबतच यश व राधिकाची प्रेमकथाही बहरली. याचवर्षी गोव्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. यानंतर आज यश राधिकाचा रिअल लाईफ हिरो झाला.मुख्यमंत्री सिद्धारमैय्या, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा आणि कुमारस्वामी आदी राजकीय दिग्दजांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. ११ डिसेंबर यश व राधिकाच्या लग्नाचे गॅ्रंड रिसेप्शन होणार आहे.