Join us

​एक्स पोर्न स्टार मिया खलिफा खरचं करणार का भारतीय चित्रपटात डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 11:15 IST

एक्स पॉर्न स्टार मिया खलिफा आपल्या चित्रविचित्र हरकतींमुळे आणि वक्त्व्यांमुळे कायम चर्चेत राहतेच. पण आता ती एका वेगळ्या कारणाने ...

एक्स पॉर्न स्टार मिया खलिफा आपल्या चित्रविचित्र हरकतींमुळे आणि वक्त्व्यांमुळे कायम चर्चेत राहतेच. पण आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. होय, मिया भारतीय सिनेमात एन्ट्री घेणार ही बातमी सध्या चर्चेत आहे. मल्याळम चित्रपट ‘चंकज2’मधून मिया डेब्यू करणार, अशी बातमी आहे. अर्थात मियाने अद्याप या बातमीला  दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे मिया खरचं भारतीय चित्रपटात दिसणार की नाही? याबद्दल तूर्तास वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास, मियाने भारतात कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळेच मिया मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणार, ही बातमी आली आणि सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. मिया या मल्याळम चित्रपटात एक आयटम साँग करणार अशी चर्चा आहे. अर्थात काहींनी ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.मिया ही एक मोठी अ‍ॅडल्ट स्टार होती. पण २०१५ मध्ये तिने अ‍ॅडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. सध्या ती स्पोर्ट्स शो होस्ट करते.   मियाचे भारतात अनेक चाहते आहे. २०१५ मध्ये  सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’च्या नवव्या सीझनमध्ये मिया दिसणार, अशी बातमी आली होती. पण मियाने या बातमीचे खंडन केले होते. शिवाय मी भारतात कधीही पाऊल ठेवणार नाही, असेही म्हटले होते. २०१६ मध्ये मिया खलिफा ही सर्वाधिक सर्च केली जाणारी पोर्न स्टार बनली होती. पण तिने अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत केवळ तीन महिने काम केले होते. मिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ALSO READ : या कारणामुळे सनी लिओनीला सोडावे लागले होते राहते आपले घरलेबनानमध्ये जन्मलेली मियाचे सोशल मीडियांवर लाखो फॉलोवर्स आहेत. अनेकदा तिच्या प्रेमात वेडे असलेले चाहते मियाला थेट मॅसेज पाठवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अलीकडे मियाने सोशल मीडियावर त्रास देणारा अमेरिकन बेसबॉल प्लेअर विल्सन याला एक्सपोज केले होते. विल्सन मियाला मॅसेज करून त्रास देत होता. मियाकडून प्रतिसाद न मिळत नसूनही त्याचे मॅसेज करणे सुरु होते. अखेर मियाने विल्सनचे सगळे पर्सनल मॅसेज सोशल मीडियावर शेअर केले होते. गतवर्षीही मियाने असेच काही केले होते. अमेरिकन फुटबॉलपटू चॅड केली याने मियाला स्नॅपॅटवर फ्रेन्डरिक्वेस्ट पाठवली होती.मियाने चॅडचे हे मॅसेल सोशल मीडियावर व्हायरल केले होते.