रोहितचे वडील हे एक स्टंटमॅन होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या वडिलांचे नाव एम.बी. शेट्टी असून त्यांनी डॉन, चोरी मेरा काम, त्रिशूल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहितचे वडील हे बॉलिवूडमध्ये कार्यरत असले तरी त्यांनी अनेक चित्रपटात खूपच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे रोहितसाठी बॉलिवूडचा प्रवास सोपा नव्हता. त्याने वयाच्या १७ व्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. त्याने एक स्पॉट बॉय म्हणून देखील इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. रोहितनेच ही गोष्ट नुकतीच इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात सांगितली. त्याने या कार्यक्रमातील स्पर्धकांशी बोलताना सांगितले, तब्बूने हकीगत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या वेळी मी तिचा स्पॉट बॉय म्हणून काम केले होते. तिच्या साड्यांना इस्त्री करण्याचे काम देखील माझेच असायचे. तसेच काजोलच्या एका चित्रपटाच्या वेळी मी तिचा स्पॉट बॉय होतो. चित्रीकरणाच्या वेळी तिचे केस थोडे देखील खराब होऊ नये याकडे मला लक्ष द्यावे लागायचे. स्पॉट बॉय म्हणून मी काम केले असल्याने हे काम किती कठीण असते याची मला चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे मी माझ्या स्पॉट बॉयच्या कामाचा आणि त्याचा नेहमीच आदर करतो. एका उच्च स्थानावर असून देखील तुमच्या हाताखालच्या लोकांना तुम्ही चांगले वागवत असाल तरच तुम्ही माणूस म्हणून चांगले होता असे मला वाटते.
Also Read : रोहित शेट्टीला बॉलिवूडमधील या सुपरस्टारसोबत करायचे आहे काम