Join us

Women's day : अमिताभ बच्चन यांचा स्पेशल संदेश, ‘HER के बिना HERO भी O होता है’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 22:29 IST

महानायक अमिताभ बच्चन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक स्पेशल मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अमिताभने जया बच्चन, मुलगी ...

महानायक अमिताभ बच्चन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक स्पेशल मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अमिताभने जया बच्चन, मुलगी श्वेता आणि ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाचा एक कोलाज फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘HER के बिना HERO भी O होता है’ अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी इक्वॅलिटीचा संदेश देताना सोशल मीडियावर जाहीर केले होते की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटप केले जाईल. त्या पार्श्वभूमीवर अमिताभचा हा संदेश खूपच महत्त्वपूर्ण समजला जात आहे. अमिताभ नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कुठल्याही घटनेवर ते हमखासपणे त्यांचे परखड मत मांडत असतात. अशात त्यांनी दिलेला हा संदेश महत्त्वपूर्ण समजला जात आहे. }}}} अमिताभ बच्चन यांनी अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या ‘पिंक’ या सिनेमात भूमिका साकारली होती. तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, अंगद बेदी आणि अ‍ॅँड्रिया तोरियांग यांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाने अनेक पुरस्कारावर नाव कोरले असून, नुकतेच राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. आता अमिताभ राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार-३’मध्ये बघावयास मिळणार असून, हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी रिलिज होणार आहे. सिनेमात जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, अमित साध, यामी गौतम, रोनित रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचबरोबर अमिताभ आमीर खान याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मध्येही झळकणार आहेत. दरम्यान महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा देत महिलांप्रती आदर व्यक्त केला.