Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकलांगाच्या भूमिकेलाही लाभले ग्लॅमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:36 IST

संजय लीला भंसालीच्या या चित्रपटात रानी मुखर्जी व अभिताभ बच्चनची मुख्य भूमिका असून यात रानी (मिशेल मक्नल्ली) जन्मापासून आंधळी ...

संजय लीला भंसालीच्या या चित्रपटात रानी मुखर्जी व अभिताभ बच्चनची मुख्य भूमिका असून यात रानी (मिशेल मक्नल्ली) जन्मापासून आंधळी असते. यात तिचे भाव कोणी समजू शकत नसल्याने ती अनेकदा हिंसक होते. या भूमिकेचे राणीने खरच सोने केले. हाव-भावातून तिने जो हृदयस्पश्री संवाद साधला तो थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडला. तिच्या या भूमिकेसाठी राणीला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता.गुजारिश'हूज लाईफ इज इट एनीवे' आणि 'द सी इनसाईड' ने प्रेरित व संजय लीला भंसाळीद्वारा दिग्दर्शित 'गुजारिश' चित्रपटात एथेन मैस्केरेहास (ऋतिक रोशन) नावाच्या जादूगराची कथा आहे. ज्यात तो क्वाड्रोप्लेजिया नावाच्या आजाराने ग्रस्त असतो. या आव्हानात्मक पात्राला ऋतिकने पडद्यावर अगदी ताकदीने उभे केले. यात ऋतिकला फक्त चेहर्‍याद्वारेच अभिनय करायचा होता. 'गुजारिश' हा त्याच्या करिअरमधील माईलस्टोन समजला जातो.बर्फीया चित्रपटात रणबीर कपूरने मूक-बधिराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने विशेष दाद मिळविली. यात त्याची जोडी प्रियंका चोपडा (झिलमिल) सोबत असून दोघेही असामान्य आजाराने ग्रस्त असता. या चित्रपटात नाते व संवेदना मुख्य भूमिकेत आहेत आणि तिथे आजारपण आडवे येत नाही. इतर अनेक चित्रपटात मस्तीखोर युवकाची भूमिका साकारणार्‍या रणबीरने यात कमालीचा अभिनय केला आहे.सदमाबालू महेंद्रच्या दिग्दर्शनातील १९८३ मध्ये आलेल्या 'सदमा' मध्ये लक्ष्मी (श्रीदेवी) एका सहा वर्षाच्या मुलीच्या भूमिकेत दिसते. एका अपघातात ती जखमी होऊन कोमात जाते व शुद्धीवर आल्यानंतर तिला काहीच आठवत नाही. आणि ती सहा वर्षांच्या मुलीप्रमाणे वागू लागते. श्रीदेवीला हा अभिनय सादर करताना खूप आव्हनांना तोंड द्यावे लागले होते. पण, तिने ही भूमिका अजरामर करून टाकली. बॉलिवूडच्या अनेक मोठय़ा स्टार्सनी शारीरिक वा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. काल प्रदर्शित झालेल्या वजीर या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांनीसुद्धा लकवाग्रस्ताची भूमिका केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व स्टार्सनी आपल्या अलौकिक अभिनयाच्या बळावर या भूमिकांना एक वेगळे वलय प्राप्त करून दिले आहे. या स्टार्सच्या संवेदनशील अभिनयामुळे या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील यात काहीच शंका नाही. अशाच काही गाजलेल्या भूमिकांचा हा आढावा खास वजीरच्या निमित्ताने येथे देत आहोत. फू'६ी''>१ं५्रे.१ी''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''> वजीरया चित्रपटाची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तरसारखे कलावंत पहिल्यांदा आमोरा-समोर येत असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, यात अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांना जास्त आकर्षण आहे. यात त्यांनी आजारी व्यक्तीची भूमिका साकारली असून त्यांचा लूकही वेगळा आहे. अशा भूमिका बीग बी किती चांगल्या पद्धतीने वठवतात हे प्रेक्षकांनी पिकू सारख्या चित्रपटातून अनुभवले आहे.