Join us

संजूबाबावर बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 09:06 IST

येरवडा कारागृहातून शिक्षा भोगून परतलेल्या अभिनेता संजय दत्तच्या सुटकेबद्दल बॉलिवूडमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बी-टाऊनने टिष्ट्वटरद्वारे संजयला शुभेच्छा ...

येरवडा कारागृहातून शिक्षा भोगून परतलेल्या अभिनेता संजय दत्तच्या सुटकेबद्दल बॉलिवूडमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बी-टाऊनने टिष्ट्वटरद्वारे संजयला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात महेश भट, जुही चावला यांच्यासह साजिद खान व सतीश कौशिक यांचाही समावेश आहे. संजय तुझे स्वागत असो!... कायद्याने आपले काम केले... वाईट काळ संपला, नवा माणूस... नवे आयुष्य... तुला व तुझ्या कुटुंबाला शुभेच्छा! - सतीश कौशिकसंजू तुझे स्वागत! आता तुझ्याकडून चांगल्या आणि चिरस्मरणात राहतील, अशा सिनेमांची प्रतीक्षा आहे.- ऋषी कपूरघरी पुनरागमन..!!देवा, मी एक, मी दोन, मी तीन, मी चार, मी पाचशे मैल्!  (नाम) वॉव.- महेश भटसंजय तू परत आलास... दत्त कुटुंबीयांसाठी सर्वांत सुखद काळ!  - जुही चावलासमाजाचे ऋण फिटले, स्वातंत्र्याचा काळ सुरू झाला. कुटुंब, चाहते आणि मित्र याच दिवसाची वाट पाहत होते. घरी स्वागत असो... बाबा!- साजिद खान--------------